सौरऊर्जानिर्मिती प्रकल्पासाठी जमीन मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:40 AM2021-04-21T04:40:40+5:302021-04-21T04:40:40+5:30

रब्बी हंगामात शेतकऱ्यांना शेती सिंचन करण्यासाठी मुबलक प्रमाणात वीज मिळत नाही. त्यातही हंगामात भारनियमन करण्यात येते. परिणामतः शेतकऱ्यांना रात्री-बेरात्री ...

Land not available for solar power project | सौरऊर्जानिर्मिती प्रकल्पासाठी जमीन मिळेना

सौरऊर्जानिर्मिती प्रकल्पासाठी जमीन मिळेना

googlenewsNext

रब्बी हंगामात शेतकऱ्यांना शेती सिंचन करण्यासाठी मुबलक प्रमाणात वीज मिळत नाही. त्यातही हंगामात भारनियमन करण्यात येते. परिणामतः शेतकऱ्यांना रात्री-बेरात्री सिंचन करावे लागते. ही समस्या दूर करण्यासाठी मुख्यमंत्री सौरऊर्जा प्रकल्पनिर्मिती करण्यात यावी, अशी शिरपूर येथील शेतकऱ्यांची मागणी होती. यासाठी गावातील सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला. कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांसाठी हा प्रकल्प झालाच पाहिजे, असा आग्रह धरला. या प्रकल्पासाठी किमान दहा एकर जमीन उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. गावामध्ये शेकडो एकर ई-क्लासची जमीन आहे. जमिनीवर काही प्रमाणात अतिक्रमणसुद्धा झालेली आहेत. सौर प्रकल्पासाठी २९ ऑक्टोबर रोजी सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली होती. या बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष श्याम गाभणे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अशोकराव अंभोरे, माजी जिल्हा परिषद सदस्य ईमदाद बागवान, पंचायत समिती सदस्य शकीलभाई पठाण,सलीम रेघीवाले, गणेश अंभोरे, गजानन ईरतकर,मारीफखा पठाण, तत्कालीन ग्रामपंचायत प्रशासक व्ही. टी. शिंदे, ग्रामविकास अधिकारी भागवत भुरकाडे, मंडलाधिकारी घनश्याम दलाल, तलाठी एन. व्ही. अंबूलकर,जे. एन. साठे यांच्यासह गावातील प्रमुख नागरिक उपस्थित होते. या बैठकीमध्ये सौरऊर्जा प्रकल्पासाठी दहा एकर जमीन देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सौर प्रकल्पासाठी सुरुवातीचे प्रयत्न सुरू झाले. मात्र त्याला अपेक्षित गती नसल्याने सौरऊर्जा प्रकल्पाचा निर्मितीसाठी या कामाला गती देणे गरजेचे झाले आहे.

००

सौरऊर्जा प्रकल्पाला जमीन देण्यासंदर्भात तहसीलस्तरावरून १९ मार्च रोजी जाहीरनामा काढण्यात आला. तो जाहीरनामा प्रसिद्धीसाठी शिरपूर ग्रामपंचायत कार्यालयात लावण्यात आला होता. पुढील कारवाई तहसीलस्तरावर सुरू आहे.

भागवत भुरकाडे

ग्रामविकास अधिकारी, शिरपूर

Web Title: Land not available for solar power project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.