सूट असतानाही जमीन महसुलाची वसुली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2020 03:46 PM2020-02-08T15:46:17+5:302020-02-08T15:46:22+5:30

रिसोड तालुक्यासह अन्यत्र काही ठिकाणी तलाठ्यांतर्फे सन २०१९-२० या वर्षात जमिन महसुलाची वसुली केली जात आहे.

Land revenue collection despite discount! | सूट असतानाही जमीन महसुलाची वसुली !

सूट असतानाही जमीन महसुलाची वसुली !

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यात २०१९ च्या आॅक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात 'क्यार' व 'महा' या चक्रीवादळामुळे जिल्ह्यातील शेतपिके व बहुवार्षिक पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे जिल्ह्यातील ७९३ गावांतील शेतकऱ्यांना जमीन महसुलात सूट देणे व परीक्षा शुल्क माफी या दोन सवलती लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी दिलेले आहेत. तथापि, रिसोड तालुक्यासह अन्यत्र काही ठिकाणी तलाठ्यांतर्फे सन २०१९-२० या वर्षात जमिन महसुलाची वसुली केली जात आहे.
अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील २ लाख ५० हजार ३५० शेतकऱ्यांच्या एकूण २ लाख ८७ हजार १६५ हेक्टरवर ३३ टक्क्यांपेक्षा अधिक पिकांचे नुकसान झाले. या नुकसानापोटी शेतकºयांना १९७ कोटी ९८ लाख ३९ हजार ८६२ रुपयांच्या निधीच्या मागणीचा अहवाल जिल्हा प्रशासनाने शासनाकडे पाठविला होता. पहिल्या व दुसºया टप्प्यातील निधी मिळालेला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील ७९३ गावांतील नुकसानग्रस्त शेतकºयांना दिलासा म्हणून जमीन महसुलात सूट आणि शेतपिकांचे नुकसान झालेल्या शेतकºयांच्या पाल्यांना शाळा व महाविद्यालयीन परीक्षा शुल्कात माफी या दोन सवलती लागू करण्यात आल्या आहेत. वाशिम तालुक्यातील १३१, मालेगाव तालुक्यातील १२२, रिसोड तालुक्यातील १००, मंगरुळपीर तालुक्यातील १३७, कारंजा तालुक्यातील १६७ व मानोरा तालुक्यातील १३६ गावांचा यामध्ये समावेश आहे. जमिन महसूलात सूट असताना, रिसोड तालुक्यासह जिल्हयात अनेक ठिकाणी शेतकºयांकडून जमिन महसूल वसूल केला जात आहे. या प्रकारामुळे शेतकºयांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.  

 


सवलत लागू झाल्याने जमिन महसूल वसुल करता येत नाही. या प्रकरणाची सविस्तर माहिती घेऊन संबंधितांना योग्य ते निर्देश दिले जातील. शेतकºयांवर अन्याय होणार नाही.
- शैलेश हिंगे
निवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम

 

 

Web Title: Land revenue collection despite discount!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.