भुसंपादनाची गती मंदावली; समृद्धी महामार्ग निर्मितीस विलंब!, कृषी समृद्धी केंद्रांना बगल, केवळ रस्ता निर्मितीस प्राधान्य
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2018 08:50 AM2018-01-08T08:50:03+5:302018-01-08T10:49:51+5:30
नागपूर ते मुंबई या ७१० किलोमिटर अंतराच्या समृद्धी महामागार्साठी राबविण्यात येणारी भुसंपादन प्रक्रिया प्रशासनासाठी बहुतांशी किचकट ठरत असून ६ जानेवारीपर्यंत ४० ते ४५ टक्केच भुसंपादन झाले आहे.
- सुनील काकडे
वाशिम- नागपूर ते मुंबई या ७१० किलोमिटर अंतराच्या समृद्धी महामागार्साठी राबविण्यात येणारी भुसंपादन प्रक्रिया प्रशासनासाठी बहुतांशी किचकट ठरत असून ६ जानेवारीपर्यंत ४० ते ४५ टक्केच भुसंपादन झाले आहे. दरम्यान, शेतकऱ्यांचा रोष थोपविण्यासाठी कृषी समृद्धी केंद्र उभारण्याच्या मुद्यास सोयीस्कर बगल देत केवळ रस्त्याकरिता लागणारी जमिनच संपादन करण्यावर विशेष भर दिला जात असल्याची माहिती सूत्रांनी शनिवारी दिली.
राज्यातील नागपूर, अमरावती, वर्धा, वाशिम, बुलडाणा, जालना, अहमदनगर, औरंगाबाद, नाशिक आणि ठाणे असे १० जिल्हे व त्याअंतर्गत येणाऱ्या ३९२ गावांना छेदून जात असलेल्या समृद्धी महामागार्साठी संयुक्त मोजणीची कामे पूर्ण झाल्यानंतर आता भुसंपादन प्रक्रिया राबविण्यात येत आहे. मात्र, त्यास म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसून ६ जानेवारीपर्यंत वाशिमसह काहीच जिल्ह्यांमध्ये ५० टक्क्यांपर्यंत भुसंपादन झाले असून इतर जिल्ह्यांमध्ये भुसंपादनाचे प्रमाण अगदीच कमी असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
राज्यशासनाकडून समृद्धी महामार्गाची घोषणा झाल्यानंतर प्रारंभी शेतकऱ्यांचे हित जोपासण्याचा कांगावा करित शासनाने प्रत्येक जिल्ह्यात कृषी समृद्धी केंद्र उभारण्याचा निर्धार केला होता. त्यात महामागार्साठी जमिनी देणाऱ्या शेतकऱ्यांना २५ टक्के विकसीत भूखंड, पाल्यांना उच्चशिक्षणात सुविधा, महात्मा फुले जनआरोग्य योजनेत कुटूंबाचा समावेश, शासकीय/निमशासकीय वित्तीय संस्थांकडून घेतलेल्या पिककजार्ची माफी आदी लाभ देऊ केला होता. सद्या मात्र कृषी समृद्धी केंद्र उभारण्याचा विषय बासनात गुंडाळून ठेवत केवळ महामागार्साठी लागणारी जमिनच सरळ खरेदी पद्धतीने संपादित केली जात आहे. शेतकऱ्यांकडून होणारा विरोध संपुष्टात आणण्यासाठी शासनाने हा मधला मार्ग काढल्याचे सिद्ध होत आहे.
आदिवासी, भुदानच्या जमिनी ठरताहेत अडचणीच्या!
समृद्धी महामागार्साठी सद्या ह्यरेडी रेकनरह्णप्रमाणे तथा सरळ खरेदी पद्धतीने भुसंपादन प्रक्रिया राबविण्यात येत आहे. मात्र, यादरम्यान आदिवासी, भुदान यासाह इतर स्वरूपातील शेकडो हेक्टर जमिनींच्या संपादनादरम्यान प्रशासनाला विविध स्वरूपातील अडचणी जाणवत असून त्या निस्तरण्यासाठी सदोदित वकिलांच्या संपर्कात राहावे लागत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामागार्चे अंतर ९७ किलोमिटर असून ह्यड्रोनह्णव्दारे सर्वेक्षण, दगड रोवणी यासह संयुक्त मोजणी प्रक्रिया पूर्ण करून भुसंपादनाचे काम सद्या सुरू आहे. ५४ गावांपैकी २० पेक्षा अधिक गावांमधील जमिनींचे संपादन झाले असून उर्वरित गावेही लवकरच पूर्ण करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशिल आहे.
- सुनील माळी, क्षेत्रीय अधिकारी तथा प्रशासक, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, वाशिम