आठवडाभरात तीन वेळा पोषण आहारात आढळल्या अळ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 03:55 PM2019-07-10T15:55:23+5:302019-07-10T15:59:53+5:30
कारंजा लाड: शहरातील अल्पसंख्याक शाळेत केंद्रीय किचनच्या माध्यमातून पुरविण्यात येणाऱ्या पोषण आहाराच्या खिचडीत आठवडाभरात तीन वेळा अळ्या आणि सोंडे आढळल्याचा प्रकार घडला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा लाड: शहरातील अल्पसंख्याक शाळेत केंद्रीय किचनच्या माध्यमातून पुरविण्यात येणाऱ्या पोषण आहाराच्या खिचडीत आठवडाभरात तीन वेळा अळ्या आणि सोंडे आढळल्याचा प्रकार घडला आहे. याची गंभीर दखल मुख्याध्यापक व शाळा समितीने घेतली असून, गटशिक्षणाधिकाऱ्यांसह नगर परिषद प्रशासन अधिकाºयांना जातीने खिचडीसह पोषण आहाराची पडताळणी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
जिल्ह्यात मागील काही दिवसांत विद्यार्थ्याना शाळेत देण्यात येणाºया पोषण आहाराच्या खिचडीत अळ्या आढळण्याचे प्रकार घडले आहेत. हा प्रकार विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने घातक आहे. मंगरुळपीर तालुक्यातील पार्डी ताड येथील अंगणवाडी केंद्रातही काही दिवसांपूर्वी खिचडीत अळ्या आढळून आल्या होत्या. आता कारंजा येथील एका अल्पसंख्याक शाळेत २ जुलै, ६ जुलै आणि ९ जुलै रोजी शिजविण्यात आलेल्या खिचडीत अळ्या आणि सोंडे असल्याचे विद्यार्थ्यांनी निदर्शनास आणून दिले आहे. हा प्रकार विद्यार्थ्यांच्या जिवासाठी धोकादायक ठरणारा असल्याने मुख्याध्यापकांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. या संदर्भात कारंजा पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाºयांना पत्र पाठवून यापुढे शाळेत खिचडी शिजविताना आवश्यक काळजी व स्वच्छतेसाठी स्वत: जातीने पडताळणी करावी, अशी मागणी केली आहे. गटशिक्षण अधिकाºयांसह शाळेत पोषण आहाराचा पुरवठा करणारा कं त्राटदार, तसेच नगर परिषद कारंजाच्या प्रशासन अधिकाºयांनाही भ्रमणध्वनीद्वारे माहिती पुरविण्यात आली आहे.
शाळेच्या पोषण आहारातील खिचडीत अळ्या आढळल्याचे विद्यार्थ्यांनी निदर्शनास आणून दिले, अशी माहिती शाळेच्यावतीने प्राप्त झाली आहे. या माहितीनुसार संबंधित शाळेत पुरविण्यात येणारा पोषण आहार तपासण्यासाठी योग्य त्या उपाय योजना करण्यात येतील.
-मधुसुदन बांडे
गटशिक्षणाधिकारी, पं.स. कारंजा