अवघ्या अर्धा तासात झाली दोन लाख रुपये लोकवर्गणी

By admin | Published: May 16, 2017 08:05 PM2017-05-16T20:05:20+5:302017-05-16T20:05:20+5:30

कारंजा लाड : पाणी फाउंडेशनच्यावतीने श्रमदानावर आधारीत असणारी "सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा" लोकसहभागातून राबविण्यात येत आहे.

In the last half an hour, two lakh rupees were distributed | अवघ्या अर्धा तासात झाली दोन लाख रुपये लोकवर्गणी

अवघ्या अर्धा तासात झाली दोन लाख रुपये लोकवर्गणी

Next

ऑनलाइन लोकमत
कारंजा लाड :  पाणी फाउंडेशनच्यावतीने श्रमदानावर आधारीत असणारी "सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा" लोकसहभागातून राबविण्यात येत आहे. स्पर्धेत कारंजा तालुक्यातील जयपुर गावाने हिरहिरीने सहभाग घेतला असून ८ एप्रिल ते १५ मे पर्यंत ३७ दिवसाच्या काळात गावाने सकाळ संध्याकाळ श्रमदान करून दुप्काळाशी दोन हात करत आतापर्यंत चार हजार घन मिटरचे काम श्रमदानातून पुर्ण केले. मात्र गाव शिवारातील जलसंधारणाची कठीन कामे मशिनव्दारे होण्यसाठी डिझेलची आवश्यता असल्याचे आवाहन सत्यमेव जयते वॉटर कप स्पधेर्तील वॉटर हिरोजने १५ एप्रिल रोजी सांयकाळी ७ वाजता आयोजीत सभेत गावकऱ्यांना केले. यावेळी गावकऱ्यांनी अर्धा तासात दोन लाख रुपये लोकवर्गनी जमा केली. ज्या पध्दतीने गावातील महीला व पुरूप युवा वर्ग आबालवृध्दा लहान मुले श्रमदानासाठी एकवटले त्याच पध्दतीने जयपुर गाव आता लोकवर्गनी साठी सुध्दा गावकरी एकवटले असल्याचे दिसून येत आहे. 
८ एप्रिलपासून सुरू झालेल्या ह्यसत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेला २२ मे रोजी थांबणार आहे. ही स्पर्धा राज्यातील तीस तालुक्यात राबविली जात असून जलसंधारणाच्या विकासासाठी जी जलचळवळ महाराप्टभर पसरली आहे, त्यातले कित्येक जलक्रांतीकारक हे स्वत:ला विसरूण सतत काहीतरी वेगळं काहीतरी नविन करण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि महत्वाचे म्हणजे महीला पुरूपांच्या खांदयाला खांदा लावून काम करत आहे. किंवा त्यापेक्षा एक पाउत पुढे असं म्हणंण जास्त योग्य ठरेल. गावकऱ्यांनी गाव पाणीदार करण्यासाठी श्रमदानाच्या माध्यमातून सि.सि.टी, एल.बी.एस, शेतीची बांध बधिस्ती, माती नाला बांध, व्हॉट आदी विविध जलसंधारणाची कामे जयपुर येथील गावकऱ्यांनी केली. श्रमदानासाठी रात्रण दिवस एक करून वॉटर कप जिंकण्याच्या प्रयत्नात आहे. श्रमदानासाठी वॉटर कप स्पर्धेत २० मार्क देण्यात येते तर मशिनव्दारे होणाऱ्या कामाला स्पधर्ेत २० मार्क मिळणार आहे. जलसंधारणाची कामे मशिनव्दारे करण्यासाठी कारंजा - मानोरा मतदार संघाचे आमदार राजेंद्र पाटणी यांच्याकडून एक पोकलँड तर भारतीय जैन संघटनेकडून एक पोंकलँड जयपुर येथे देण्यात आला. या मशिनच्या डिझेल साठी लोकवर्गनी कुठून आणायची हा प्रश्न जयपुर गावापुढे होता. याकरीता १५ एप्रिल रोजी गावकऱ्यांची सभा घेण्यात आली. सभेत कारंजा येथील आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त तथा जे.डी.चवरे विदयालयाचे माजी मुख्याध्यापक अविनाश मुथोळकर यांची उपस्थिती होती. 
यावेळी मुथोळकर यांनी जयपुर गावला टिकास व फावडे व टोपले आदी साहीत्य दिले. तसेच डिझेल साठी ५००० हजार रुपये दिले. यावेळी गावकरी सुध्दा लोकवर्गनी देण्यासाठी ऐकवटले गावकऱ्यानी अर्धा तासात दोन लाख रुपये जलसंधारणाच्या कामात लोकवर्गनी जमा केली. ज्या पध्दतीने गाव श्रमदानासाठी एकवटले त्याच पध्दतीने आता गाव लोकवर्गनीसाठी एकवटल एवढेच नाहीत तर गावातील संजय गांधी निराधार योजनेचा पगार घेणारे अंबादास रामटेके यांनी एक महीण्याचा पगार दिला. तसेच तेथील कार्यरत असणारे ग्रामसेवक नरेश गजभिये यांनी एक महीण्याचा पगार देवुन जयपुर येथील श्रमकऱ्यांचा उत्साह वाढविला. जलसंधारणाच्या कामासाठी गावातील ज्या ज्या व्यक्तीने लोकवर्गनी दिली. त्या वर्गनी दात्याची नावे गावातील चैकाचैकात लावण्यात येतील असे वॉटर हिरोजने जाहीर केले

 

Web Title: In the last half an hour, two lakh rupees were distributed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.