अनसिंग येथे मागीलवर्षीच्या खताची चढ्या दरात विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:29 AM2021-05-28T04:29:50+5:302021-05-28T04:29:50+5:30
दरवर्षीप्रमाणे यंदाही कापसाचा पेरा वाढणार असल्याचे चित्र आहे. कापूस लागवडीकरिता वेगवेगळ्या प्रकारच्या खतांची आवश्यकता आहे. खत कंपन्यांनीसुद्धा खताचे ...
दरवर्षीप्रमाणे यंदाही कापसाचा पेरा वाढणार असल्याचे चित्र आहे. कापूस लागवडीकरिता वेगवेगळ्या प्रकारच्या खतांची आवश्यकता आहे. खत कंपन्यांनीसुद्धा खताचे दर प्रचंड प्रमाणात वाढविले आहेत. खताच्या वाढलेल्या दराबाबत केंद्र सरकारवर दबाव वाढला आहे. अनसिंग व अनसिंग परिसरातील कृषी केंद्रांचे संचालक हे विविध रासायनिक खतांचे बुकिंग करून ठेवत असतात. आजच्या घडीला अनेक कृषी केंद्रांमध्ये मार्चच्या आधीच आणलेल्या खताचा मोठ्या प्रमाणात साठा आहे. मात्र नव्या खताचे दर वाढल्याने त्याचा फायदा काही कृषी केंद्रांचे मोठ-मोठे संधिसाधू संचालक घेताना दिसून येत आहेत. मागील वर्षाच्या दरापेक्षा २०० ते ३०० रुपये जास्त दराने खताची विक्री करताना दिसत आहेत. खत मागण्यास गेलेल्या शेतकऱ्यांना आधी खत उपलब्ध नाही, असे सांगण्यात येत आहे; परंतु ज्या शेतकऱ्याने २०० ते ३०० रुपये अतिरिक्त देण्याचे ठरविले, अशा शेतकऱ्यांना नगदीनेच खताची विक्री होत असत्याचे चित्र दिसत आहे. खताची जास्त दराने विक्री होत असताना, बिल मात्र मूळ किमतीचेच दिले जात आहे. कृषी विभागाची समिती स्थापन करून किंवा भरारी पथक निर्माण करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रामेश्वर गोरे यांनी केली आहे. यामुळे शेतकऱ्यांची होणारी लूट थांबेल.