‘आम्ही ग्रामरक्षक’ अभियानास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:26 AM2021-06-23T04:26:48+5:302021-06-23T04:26:48+5:30
जिल्ह्यात १८ जून ते २५ जूनच्या कालावधीत ‘आम्ही ग्रामरक्षक’ हे अभियानाच्या अभाविपचे कार्यकर्ते थर्मल स्क्रिनिंग, निर्जंतुकीकरण, कोरोना लसीकरण जनजागृती ...
जिल्ह्यात १८ जून ते २५ जूनच्या कालावधीत ‘आम्ही ग्रामरक्षक’ हे अभियानाच्या अभाविपचे कार्यकर्ते थर्मल स्क्रिनिंग, निर्जंतुकीकरण, कोरोना लसीकरण जनजागृती करणार आहेत.
या अभियानास सुरुवात झाली असून, हे अभियान २५ जूनपर्यंत चालणार आहे. वाशिम जिल्ह्यातील चार तालुक्यांमध्ये, ४७ गावांतील सात हजार परिवार व ३० हजार लोकांपर्यंत पोहोचण्याचा मानस आहे . यात ४० कार्यकर्त्यांचा सहभाग आहे. या अभियानाच्या माध्यमातून अतिदुर्गम ग्रामीण भागात कोरोना लसीकरणासंदर्भात लोकांमध्ये असलेला गैरसमज दूर होईल, तसेच ‘देश हमे देता है सब-कुछ, हम भी तो कुछ देना सिखे’ या भावनेने अभाविपच्या या ‘महा अभियानात’ समाजातील युवा विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहभागी व्हावे, असे आवाहन या अभियानाचे जिल्हाप्रमुख राहुल खरात यांनी केले आहे.