वाशिम जिल्ह्यामध्ये वेतनासाठी ‘सीएमपी’ प्रणालीचा शुभारंभ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 12:00 PM2021-08-01T12:00:42+5:302021-08-01T12:00:48+5:30

Launch of 'CMP' system for salaries in Washim district : वेतन दरमहा नियोजित वेळेत होण्यासाठी जिल्ह्यात ‘सीएमपी’ प्रणालीचा ३० जुलै रोजी शुभारंभ करण्यात आला.

Launch of 'CMP' system for salaries in Washim district! | वाशिम जिल्ह्यामध्ये वेतनासाठी ‘सीएमपी’ प्रणालीचा शुभारंभ!

वाशिम जिल्ह्यामध्ये वेतनासाठी ‘सीएमपी’ प्रणालीचा शुभारंभ!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यातील जिल्हा परिषद व खासगी अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन दरमहा नियोजित वेळेत होण्यासाठी जिल्ह्यात ‘सीएमपी’ प्रणालीचा ३० जुलै रोजी शुभारंभ करण्यात आला. यापुढे वेतन दरमहा नियमित होईल, असा आशावाद शिक्षण विभाग व शिक्षकांमधून व्यक्त होत आहे.
जिल्हा परिषद व खासगी अनुदानित, तसेच अंशत: अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारऱ्यांचे वेतन शालार्थ प्रणालीमार्फत होत असल्याने वेतन खात्यावर जमा होण्यासाठी विलंब होत होता. याबाबत शिक्षक संघटनांनी आवाज उठविला तसेच जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांच्याशी चर्चा केली. शिक्षण सभापती चक्रधर गोटे यांनी शिक्षकांच्या वेतनातील विलंब दूर करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या. शिक्षणाधिकारी आर.डी. तांगडे यांनी यासंदर्भात जिल्हास्तरीय समितीचे गठन करीत ‘सीएमपी’ प्रणालीद्वारे वेतन होण्यासाठी कालमर्यादित कार्यक्रम तयार केला. या कामी उपशिक्षणाधिकारी गजानन डाबेराव, उपशिक्षणाधिकारी आकाश अहाळे यांचेही सहकार्य लाभले. अखेर ३० जुलै रोजी जिल्ह्यात ‘सीएमपी’ प्रणालीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. श्याम गाभणे, आमदार अ‍ॅड. किरणराव सरनाईक, आमदार अमित झनक, सभापती चक्रधर गोटे, मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, मुख्य लेखा व वित्त अधिकारी तुषार मोरे, शिक्षणाधिकारी आर.डी. तांगडे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. 

कर्मचाऱ्यांना दिलासा! 
शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन दरमहा १ तारखेला करण्यात यावे, असा आदेश शालेय शिक्षण विभागाने यापूर्वीच दिलेला आहे. मात्र, वेतनास दोन- दोन महिने विलंब होत होता. त्यामुळे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत होते.  ‘सीएमपी’ प्रणालीद्वारे वेतन होण्यासाठी शिक्षणाधिकारी तांगडे यांच्या मार्गदर्शनात सहायक प्रशासन अधिकारी गजानन खुळे, नीलेश देवकते, सतीश सरनाईक, सुनील कोल्हे यांनी तांत्रिक जबाबदारी पार पाडली. 

Web Title: Launch of 'CMP' system for salaries in Washim district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.