‘लोकमत रक्ताचं नातं’ मोहिमेस थाटात प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:25 AM2021-07-03T04:25:46+5:302021-07-03T04:25:46+5:30
कोरोना विषाणू संसर्गाच्या संकट काळात रक्तदानाच्या कार्य बहुतांशी थांबले होते. यादरम्यान आयोजित केल्या जाणाऱ्या रक्तदान शिबिरांनाही विशेष प्रतिसाद मिळाला ...
कोरोना विषाणू संसर्गाच्या संकट काळात रक्तदानाच्या कार्य बहुतांशी थांबले होते. यादरम्यान आयोजित केल्या जाणाऱ्या रक्तदान शिबिरांनाही विशेष प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे रक्ताची कमतरता जाणवायला लागली. ती भरून काढण्यासाठी ‘लोकमत’ने पुढाकार घेतला असून २ जुलै ते १४ जुलै या कालावधीत ‘लोकमत रक्ताचं नातं’ ही अभिनव मोहीम हाती घेण्यात आली आहे. यावेळी डाॅ. नारायण डाळे, सामाजिक कार्यकर्ते किरण साेमाणी, दिगंबर निरगुडे, डाॅ. सुजाता जाजू, डाॅ. अनुराधा दागडिया, अर्चना नारायण डाळे आदिंची उपस्थिती हाेती.
त्यानुसार, २ जुलै रोजी वाशिम येथील विठ्ठलवाडी मंगल कार्यालयासमाेर असलेल्या कांतादेवी डाळे रक्तपेढीच्या नियाेजित ईमारतीत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक शिवाजी ठाकरे यांच्यासह इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले. १४ जुलैपर्यंत सुरू राहणाऱ्या या मोहिमेत सहभागी होऊन जिल्ह्यातील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेऊन रक्तदान करावे, असे आवाहन याप्रसंगी पोलीस अधीक्षक परदेशी यांनी केले.
.........................
बाॅक्स :
महिला पोलीस कर्मचाऱ्यांचीही हजेरी
‘लोकमत रक्ताचं नातं’ या मोहिमेच्या पहिल्या दिवशी वाशिमच्या डाळे रक्तपेढीत आयोजित रक्तदान शिबिरास चांगला प्रतिसाद मिळाला. यादरम्यान वाशिम पोलीस दलात कार्यरत महिला पोलीस कर्मचाऱ्यांनीही हजेरी लावली. याप्रसंगी लोकमतच्या वाशिम कार्यालयात कार्यरत विजय वानखेडे यांनीही रक्तदान केले.
...................
शिबिराचे वेळापत्रक
५ जुलै : ग्रामीण रुग्णालय, मंगरूळपीर
६ जुलै : जिल्हा परिषद सभागृह, वाशिम
८ जुलै : साबू हॉस्पिटल, वाशिम
१० जुलै : शिवाजी शाळा, रिसोड
१० जुलै : पाटणी चौक, वाशिम
१० जुलै : साई मंदिर, शेलुबाजार
११ जुलै : तहसील कार्यालय, वाशिम
१३ जुलै : पंचायत समिती, कारंजा