वाशिम शहरात हिवताप जनजागरण मोहिमेस प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:29 AM2021-06-25T04:29:03+5:302021-06-25T04:29:03+5:30

पावसाळ्याची सुरुवात होताच हिवताप साथरोग यापासून आरोग्य सुरक्षित राहावे म्हणून जिल्हा हिवताप अधिकारी यांच्या मार्गदर्शनात शहरामध्ये हिवताप जनजागरण व ...

Launch of Malaria Awareness Campaign in Washim City | वाशिम शहरात हिवताप जनजागरण मोहिमेस प्रारंभ

वाशिम शहरात हिवताप जनजागरण मोहिमेस प्रारंभ

Next

पावसाळ्याची सुरुवात होताच हिवताप साथरोग यापासून आरोग्य सुरक्षित राहावे म्हणून जिल्हा हिवताप अधिकारी यांच्या मार्गदर्शनात शहरामध्ये हिवताप जनजागरण व गप्पी मासे सोडण्याची मोहीम गुरुवारपासून राबविण्यात येत आहे.

सध्या पावसाची सुरुवात झाली असल्यामुळे हिवताप, चिकनगुनिया आदि कीटकजन्य आजार उद्भवतात. हे रोग होऊ नये, याकरिता उपाययोजना संदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राडोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर तसेच नारी प्राथमिक आरोग्य केंद्र येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. सुजाता भगत यांनी सदर उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. कोणताही ताप असल्यास रक्त तपासून योग्य उपचार घ्यावा, तसेच घरासभोवतातील व परिसरातील साचलेले घाण पाणी वाहते करावे, असे आवाहन केले. ऑनाफिलीस व एडिस डास पाण्यावर अंडी घालतात, त्यामुळे वापरावयाच्या पाण्याचे साठे स्वच्छ करून झाकून ठेवावे. नारळाच्या करवंट्या, माठ, टायर यांमध्ये पाणी साचू न देता उबडे करून ठेवावे, तसेच एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा, जेणेकरून त्यामुळे मच्छरांची उत्पत्ती होणार नाही, ही दक्षता घ्यावी, असे आवाहन केले. यावेळी साचलेल्या पाण्यामध्ये डास अळी भक्षक गप्पी मासे सोडण्यात आले. सदर मोहिमेसाठी विजय शहारे, नितीन व्यवहारे, अविनाश सोनोने, वानखेडे,नंदा गवळी व डवळे यांनी परिश्रम घेतले. जनतेला आरोग्य शिक्षणाच्या माध्यमातून हिवताप व डेंग्यूविषयी डॉ. सुजाता भगत यांनी जनतेला मार्गदर्शन केले.

Web Title: Launch of Malaria Awareness Campaign in Washim City

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.