वाशिम शहरात हिवताप जनजागरण मोहिमेस प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:27 AM2021-06-26T04:27:44+5:302021-06-26T04:27:44+5:30
सध्या पावसाची सुरुवात झाली असल्यामुळे हिवताप, चिकन गुनिया आदी कीटकजन्य आजार उद्भवतात. हे रोग होऊ नये, याकरिता उपाययोजना संदर्भात ...
सध्या पावसाची सुरुवात झाली असल्यामुळे हिवताप, चिकन गुनिया आदी कीटकजन्य आजार उद्भवतात. हे रोग होऊ नये, याकरिता उपाययोजना संदर्भात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राडोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर तसेच नारी प्राथमिक आरोग्य केंद्र येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. सुजाता भगत यांनी सदर उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. कोणताही ताप असल्यास रक्त तपासून योग्य उपचार घ्यावा, तसेच घरासभोवताली व परिसरातील साचलेले घाण पाणी वाहते करावे, असे आवाहन केले. ऑनाफिलीस व एडिस डास पाण्यावर अंडी घालतात, त्यामुळे वापरावयाचे पाण्याचे साठे स्वच्छ करून झाकून ठेवावे. नारळाच्या करवंट्या, माठ, टायर यामध्ये पाणी साचू न देता उघडे करून ठेवावे, तसेच एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा, जेणेकरून त्यामुळे मच्छरांची उत्पत्ती होणार नाही, ही दक्षता घ्यावी, असे आवाहन केले. यावेळी साचलेल्या पाण्यामध्ये डास अळी भक्षक गप्पी मासे सोडण्यात आले. सदर मोहिमेसाठी विजय शहारे, नितीन व्यवहारे, अविनाश सोनोने, वानखेडे,नंदा गवळी व डवळे यांनी परिश्रम घेतले. जनतेला आरोग्य शिक्षणाच्या माध्यमातून हिवताप व डेंग्यू विषयी डॉ. सुजाता भगत यांनी जनतेला मार्गदर्शन केले.