जिल्ह्यात शिवसंपर्क मोहिमेला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:46 AM2021-07-14T04:46:55+5:302021-07-14T04:46:55+5:30
खासदार गवळी यांच्या नेतृत्वाखाली वाशिम तालुक्यातील गावागावात जाऊन पदाधिकारी सदस्य नोंदणी, गटप्रमुख, बुथप्रमुख व शाखाप्रमुखांची नव्याने नियुक्ती करण्याचे काम ...
खासदार गवळी यांच्या नेतृत्वाखाली वाशिम तालुक्यातील गावागावात जाऊन पदाधिकारी सदस्य नोंदणी, गटप्रमुख, बुथप्रमुख व शाखाप्रमुखांची नव्याने नियुक्ती करण्याचे काम या शिवसंपर्क अभियानामध्ये शिवसेना पदाधिकारी करीत आहेत. या मोहिमेमध्ये जिल्हाप्रमुख मापारी, युवा सेना जिल्हाप्रमुख रवी भांदुर्गे, उपजिल्हाप्रमुख महादेव सावके, शिवसेना तालुकाप्रमुख रामदास मते पाटील, पं.स. सदस्य बालाजी वानखेडे, पं.स. सदस्य पांडुरंग पांढरे, समाधान वायचाळ, रामकिसन वानखेडे, उपतालुकाप्रमुख गजानन जैताडे, शाखाप्रमुख निरंजन गावंडे, उपतालुका प्रमुख राजू बोडखे, बंडू कोल्हे, मनोज गायकवाड, बालू माल, दिलीप शिंदे, संतोष गावंडे, श्यामसिंग ठाकूर, जगन कापसे, शिवम घुगे, राम बोरा, पंकज पवार, ज्ञानेश्वर गोरे, रवी खोटे, नितीन जैताडे, नंदू भोयर, विठ्ठल चोथमल, रत्नाकर गंगावणे, संतोष जउळकर, सुभाष कोरडे, हरिभाऊ कोरडे, बळराम महाराज, पांडुरंग कोरडे, बालाजी कोरडे यांची उपस्थिती होती.