खरेदी विक्री संघाच्या अध्यक्ष निवडीसाठी नेत्यांकडे मनधरणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 04:47 PM2020-08-19T16:47:50+5:302020-08-19T16:48:14+5:30
सर्व समंतीनेच अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवड केल्याजाईल असे संकेत प्राप्त होत आहे
वाशिम : अवघ्या दिड महीण्यात कालावधी संपत असलेल्या मानोरा खरेदी विक्री संघाच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवड येत्या २१ आॅगस्टला होत आहे . अगदी शेवटच्या टप्प्यात असलेल्या संघाच्या अध्यपदी वर्णी लागावी यासाठी इच्छूकांनी आपल्या नेत्यांकडे मनधरणी चालु केली आहे .
मानोरा खरेदी विक्री संघाच्या अध्यक्ष सुरेन्द देशमुख यांच्यावर अविश्वास दहा संचालकांनी दाखल केल्यावर अविश्वासला सामोरे जाण्यापुर्वी राजीनामे सादर करण्यात आले होते , परंतु नविन निवडीला आव्हान दिल्याने काही काळ हि निवड लांबलीवर पडली होती . दाखल केलेली याचीका फेटाळली गेल्याने नविन अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाचा निवडीचा मार्ग मोकळा झाला . त्या अनुषंगाने २१ आॅगस्ट रोजी खरेदी विक्री संघाच्या सभागृहात सहाय्यक निबंधक यांनी निवडीचा कार्यक्रम आयोजीत केला आहे. केवळ दिड महीन्यात संघाचा कालावधी संपत आहे . या निवडी साठी संचालकानी कंबर कसली आहे . खरेदी विक्री संघावर सर्वसमावेशक आघाडीची सत्ता आहे . सर्वसमावेशक कडे ७ तर ठाकरे यांच्या कडे ६ संचालक अशी परिस्थिती होती , परंतु गत विधानसभा निवडणुकीत माजी आमदार डहाके यांच्या सोबत मनोमिलन झाल्याने दोन्ही गट एकञ आले आहेत त्यामुळे अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी फारशी रस्सीखेच होणार नसल्याचे चित्र आहे . राजकीय दुष्ट्या जरी मनोमिलन झाली असल्याचे पहावयास मिळत असले तरी संचालक अद्यापही गटातटाला महत्त्व देतात . संघाचा सहा संचालकाचा गट माजी आमदार डहाके यांच्या निवास्थानी भेटायला गेला , त्या मध्ये मोतीराम पाटील , प्रकाश राठोड , डॉ रामराव राठोड, दत्ता पाटील, वंदना विलास पाटील, उज्वला अभय देशमुख यांचा समावेश होता. यांनी भेट घेऊन सुरेन्द देशमुख यांची सुध्दा आणण्याची जबाबदारी घेतली आहे , परंतु संचालकाच्या मनात काहीही चालले असतील तरी दोन्ही नेते मंडळी या बाबतीत कमालीचे मौन ठेऊन आहेत . असे असले तरी सर्व समंतीनेच अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवड केल्याजाईल असे संकेत प्राप्त होत आहेत.