संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळातर्फे शेतकरी व तरुणांसाठी चर्मोद्योग प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 01:56 PM2017-11-14T13:56:10+5:302017-11-14T13:56:33+5:30
वाशिम : संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत चांभार, ढोर, मोची, होलार या सर्व प्रवर्गातील शेतकरी, तरुणांसाठी उत्तर प्रदेशमधील फुरसतगंज येथे दोन महिन्यांचे (डिसेंबर ते जानेवारी) प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.
वाशिम : संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत चांभार, ढोर, मोची, होलार या सर्व प्रवर्गातील शेतकरी, तरुणांसाठी उत्तर प्रदेशमधील फुरसतगंज येथे दोन महिन्यांचे (डिसेंबर ते जानेवारी) प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये सर्टिफिकेट प्रोग्रॅम इन कटिंग आॅपरेटर-फुटवेअर, सर्टिफिकेट प्रोग्रॅम इन क्लोजिंग आॅपरेटर-फुटवेअर या प्रशिक्षण योजना राबविण्यात येणार आहेत. तरी जिल्ह्यातील इच्छुक युवकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ (लिडकॉम)चे जिल्हा समन्वयक यांनी केले आहे.
सदर प्रशिक्षणासाठी १८ ते ३५ वर्षे वयोगटातील, किमान ८ वी पास युवक अर्ज करू शकतात. अजार्सोबत जातीचा दाखला, जन्मतारखेचा दाखला, रेशनकार्ड, आधारकार्ड, फोटो जोडणे आवश्यक आहे. १५ व १६ नोव्हेंबर २०१७ रोजी विहित नमुन्यातील अर्ज संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, वाशिम येथील जिल्हा कार्यालयात स्वीकारले जाणार आहेत. विहित नमुन्यातील अर्ज याच कार्यालयात उपलब्ध आहेत. १६ नोव्हेंबर २०१७ पर्यंत प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी १७ ते १८ नोव्हेंबर २०१७ रोजी होणार आहे. तसेच २० ते २२ नोव्हेंबर दरम्यान प्रत्यक्ष मुलाखतीचे आयोजन करण्यात येईल. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे लिडकॉमचे जिल्हा व्यवस्थापक यांनी कळविले आहे