कामगार अधिवेशनात उपस्थित एसटी कर्मचाऱ्यांची लागणार रजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2020 02:31 PM2020-03-08T14:31:36+5:302020-03-08T14:31:52+5:30
एसटी कर्मचाºयांना त्या दिवसाची रजा मंजूर करण्याच्या सुचना एसटीच्या मध्यवर्ती कार्यालयाने ६ मार्च रोजी सर्व विभागस्तरावर दिल्या आहेत.
वाशिम: कोल्हापूर येथे १३ आणि १४ फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ (एसटी) कामगार संघटनेच्या अधिवेशनास उपस्थित राहिल्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांची कामावर अनुपस्थिती राहिली. यामुळे वेतन कपात होऊ नये म्हणून त्या कर्मचाºयांना रजा मंजूर करण्याची मागणी करण्यात आली होती. त्या मागणीची दखल घेऊन संबंधित एसटी कर्मचाºयांना त्या दिवसाची रजा मंजूर करण्याच्या सुचना एसटीच्या मध्यवर्ती कार्यालयाने ६ मार्च रोजी सर्व विभागस्तरावर दिल्या आहेत.
महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्यावतीने कोल्हापूर येथे १३ आणि १४ फेबु्रवारी २०२० रोजी संघटनेचे वार्षिक अधिवेशन आयोजित केले होते. या अधिवेशनात एसटीच्या राज्यभरातील ३१ विभागातील कर्मचारी सहभागी झाले होते. अधिवेशनास उपस्थित राहिल्याने संबंधित कर्मचारी कर्तव्यावर हजर राहू शकले नाहीत. त्यामुळे त्यांच्या अधिवेशन काळातील उपस्थितीच्या दिवशीचे वेतन कपात होण्याची शक्यता होती. या पृष्ठभुमीवर महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्यावतीने अधिवेशनात उपस्थित असलेल्या कर्मचाºयांची त्या दिवसाची रजा मंजूर करण्याची मागणी एसटीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांकडे १७ फेबु्रवारी रोजी सादर केलेल्या पत्राद्वारे करण्यात आली होती. त्या मागणीची दखल घेण्यात आली असून, अधिवेशन काळातील एसटी कर्मचाºयांच्या उपस्थितीच्या दिवसाची रजा संबंधित कर्मचाºयांच्या खात्यावर शिल्लक असलेल्या रजांमधून मंजूर करण्याच्या सुचना मध्यवर्ती कार्यालयाने सर्व विभाग नियंत्रकांना ६ मार्च रोजी पत्र पाठवून दिल्या आहेत.