सोनल प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी सोडा ; शेलुबाजारच्या व्यापाऱ्यांनी पुकारला बंद  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 04:30 PM2018-03-31T16:30:36+5:302018-03-31T16:30:36+5:30

शेलूबाजार (वाशिम) : सोनल सिंचन प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवून ते २० गावातील नागरिकांना विनाविलंब उपलब्ध करावे. तसेच या प्रकल्पातील पाणी इतरत्र वळवू नये, या मागणीसाठी येथील व्यापाऱ्यांनी १ एप्रिल रोजी व्यापारपेठ बंद पुकारला असून आपापली प्रतिष्ठाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्याचा निर्धार केला आहे.

Leave water from Sonal project; Shulubazar traders will call shut down | सोनल प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी सोडा ; शेलुबाजारच्या व्यापाऱ्यांनी पुकारला बंद  

सोनल प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी सोडा ; शेलुबाजारच्या व्यापाऱ्यांनी पुकारला बंद  

Next
ठळक मुद्देसोनल संघर्ष समितीने केलेल्या चर्चेच्या वेळी समितीच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र, ३१ मार्चपर्यंत यासंदर्भात कुठलीच ठोस कार्यवाही झालेली नाही. यासाठी शेलूबाजार येथील व्यापाऱ्यांनी एकत्र येवून १ एप्रिल रोजी आपापली प्रतिष्ठाने बंद ठेऊन संघर्ष समितीला जाहीर पाठींबा दिला आहे.


शेलूबाजार (वाशिम) : सोनल सिंचन प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवून ते २० गावातील नागरिकांना विनाविलंब उपलब्ध करावे. तसेच या प्रकल्पातील पाणी इतरत्र वळवू नये, या मागणीसाठी येथील व्यापाºयांनी १ एप्रिल रोजी व्यापारपेठ बंद पुकारला असून आपापली प्रतिष्ठाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्याचा निर्धार केला आहे. यासंदर्भात सोनल संघर्ष समितीने घेतलेल्या भुमिकेचेही व्यापाऱ्यांनी समर्थन केले आहे.
सोनल पाणलोट क्षेत्र परिसरातील २० गावाच्या लोकांनी सोनल प्रकल्पाचे पाणी पिण्यासाठी त्वरीत सोडण्यात यावे तसेच सोनलचे पाणी इतरत्र वळवू नये या मागणीसाठी २७ मार्च रोजी हजारोंच्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली होती. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांसोबत सोनल संघर्ष समितीने केलेल्या चर्चेच्या वेळी समितीच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र, ३१ मार्चपर्यंत यासंदर्भात कुठलीच ठोस कार्यवाही झालेली नाही. दुसरीकडे सोनल प्रकल्प परिसरात वास्तव्य करणाऱ्या सुमारे २० गावांमधील लोकांना पिण्याचे पाणी मिळेनासे झाले आहे. ही बाब लक्षात घेवून संबंधित गावकऱ्यांना पिण्याचे पाणी तत्काळ उपलब्ध करावे, यासाठी शेलूबाजार येथील व्यापाऱ्यांनी एकत्र येवून १ एप्रिल रोजी आपापली प्रतिष्ठाने बंद ठेऊन संघर्ष समितीला जाहीर पाठींबा दिला आहे. ३१ मार्च रोजी बालाजी मंदिरात आयोजित बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी कृषी सेवा केंद्र संघटना, किराणा दुकानदार संघटना, सराफा असोसिएशन, हार्डवेअर असोसिएशन, हॉटेल्स संचालक व सर्व व्यापारी उपस्थित होते.

Web Title: Leave water from Sonal project; Shulubazar traders will call shut down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.