मालेगाव न्यायालयात कायदेविषयक शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:30 AM2021-09-02T05:30:17+5:302021-09-02T05:30:17+5:30
विधी सेवा प्राधिकरण मालेगावद्वारा जनजागृती व्हावी याकरिता सतत कायदेविषयक शिबिर आयोजित होत राहतात, त्या अनुषंगाने २७ ऑगस्ट रोजी मालेगाव ...
विधी सेवा प्राधिकरण मालेगावद्वारा जनजागृती व्हावी याकरिता सतत कायदेविषयक शिबिर आयोजित होत राहतात, त्या अनुषंगाने २७ ऑगस्ट रोजी मालेगाव न्यायालयात वाहतुकीबाबतचे जनतेने पालन करायचे नियम व वाहतुकीचे नियम या विषयावर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमामध्ये शिबिरातील विषयावर शिरपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार वानखेडे यांनी वाहतुकीबाबतचे जनतेने पालन करायचे नियम या विषयावर मार्गदर्शन केले. ॲड. मगर यांनी वाहतुकीचे नियम काय असतात या विषयावर मार्गदर्शन केले. दिवाणी न्यायालयाचे दिवानी न्यायाधीश बोहरा यांनी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यास काय शिक्षा होते या विषयावर मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाला पक्षकारांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन ॲड. बोरचाटे यांनी केले तर आभार प्रदर्शन हे न्यायालयाचे वरिष्ठ लिपिक मोहम्मद अकबर यांनी केले. सदर कार्यक्रमाला तालुका वकील संघाचे सर्व पदाधिकारी, विधिज्ञ सदस्यासह न्यायालयाचे कर्मचारी यांची उपस्थिती होती.
310821\img-20210827-wa0051.jpg
shibir