आमदारांनी घेतला कारंजा व मानोरा क्रिडा विभागाचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 01:37 PM2018-04-21T13:37:27+5:302018-04-21T13:43:43+5:30
कारंजा लाड - स्थानिक विश्रामगृहावर २० एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजता आमदार राजेंद्र पाटणी यांनी कारंजा व मानोरा क्रीडा विभागाचा आढावा घेतला.
कारंजा लाड - स्थानिक विश्रामगृहावर २० एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजता आमदार राजेंद्र पाटणी यांनी कारंजा व मानोरा क्रीडा विभागाचा आढावा घेतला. यावेळी मुलभूत सुविधा उपलब्ध करण्यावर भर दिला असून, टेबल टेनिस हॉल, बॅडमिंटन हॉल तसेच जीम यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याच्या सुचना पाटणी यांनी संबंधित अधिकाºयांना दिल्यात.
बैठकीला कारंजा तहसीलदार सचिन पाटील, मानोरा तहसीलदार सुनिल चव्हाण, जिल्हा क्रिडा अधिकारी पांडे, तालुका क्रिडा अधिकारी चंद्रकांत उप्पलवार, पोलिस निरीक्षक बोडखे, कारंजा सार्वजनिक बांधकाम विभागाचे काकड, सार्वजनिक बांधकाम विभाग मानोराचे बिल्लारी, नगर परिषदेचे दरेकार, विद्युत वितरण कंपनीचे शेंद्रे, याशिवाय क्रिडा संबंधित बास्केटबॉल सचिव शशिकांत नांदगावकर, टेबल टेनिसचे अध्यक्ष अॅड.विजय बगडे, विवेक गहाणकरी, हॅडबॉलचे राहुल गावंडे, पराग गुल्हाणे, धनुर्विद्याचे श्रीरंग सावरकर, तायकांडोचे नितीन मेडें आदींसह बहुसंख्य मान्यवरांची उपस्थिती होती. बैठकीमध्ये क्रिडा संकुलात स्वच्छता गृह, पिण्याचा पाण्याचा प्रश्न, सुरक्षा संदर्भात, अंतर्गत रस्ता, १३३ के.व्ही.ची लाईन हटविण्याबाबत चर्चा करण्यात आली. याशिवाय टेबल टेनिस, बॅडमिंटन हॉल तसेच जीम यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याच्या सुचना अधिकाºयांना दिल्यात. तसेच क्रिडा संकुलासाठी प्रशासकीय कार्यालय व विद्युतच्या व्यवस्थे संदर्भात चर्चा करण्यात आली.