शेतक-यांना कर्जमुक्ती देण्यास सावकारांचा नकार
By admin | Published: September 21, 2016 02:20 AM2016-09-21T02:20:20+5:302016-09-21T02:20:20+5:30
वाशिम जिल्ह्यातील वास्तव; एकाच तालुक्यातील असण्याची अट समोर करून शेतक-यांची बोळवण करण्यात येत आहे.
वाशिम, दि. २0 - शेतकर्यांना कर्जाच्या विळख्यातून सोडवण्यासाठी शेतकर्यांनी खासगी सावकारांकडून घेतलेले कर्ज फेडण्याचा निर्णय राज्य सरकार सरकारने घेतला होता. वाशिम जिल्ह्यात मात्र अद्यापही बहुतांश शेतकरी या लाभापासून वंचित आहेत. यामध्ये मानोरा तालुक्याच्या एकट्या इंझोरी येथील ७0 शेतकर्यांचा समावेश असून, तालुक्याची अट समोर करून या शेतकर्यांना वंचित ठेवले जात आहे.
बँकाच्या माध्यमातून वेळेवर कर्ज मिळत नसल्याने शेतकरी सावकारांकडून कर्ज घेतात. ही सावकारी कर्जे हेही शेतकर्यांच्या आत्महत्येमागील एक कारण आहे. त्यामुळे परवानाधारक सावकाराकडून घेतलेले शेतकर्यांचे कर्जही माफ करण्याचा निर्णय सरकारने २0१५ मध्ये घेतला होता. विदभार्तील साडेतीन लाख शेतकर्यांना वैध सावकारी कजार्तून यामुळे मुक्ती मिळणार आहे. जवळ जवळ ३१७ कोटी रुपयांचे कर्ज या शेतकर्यांनी वैध सावकारांकडून घेतले आहे. शासनाच्या निर्णयानुसार ३0 नोव्हेंबर २0१४ पयर्ंतचे वैध सावकारी कर्ज आणि ३0 जून २0१५ पयर्ंतचे त्या कर्जावरील व्याजाची माफी शेतकर्यांना मिळणार होती. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास मात्र अनेक सावकार नकार देत असल्याच्या तक्रारी शेतकर्यांकडून करण्यात येत आहेत. शासनाच्या निर्णयानुसार सहकार विभागाने कर्जमाफीचा आदेश काढून ९१७८ पैकी शेतकरी किती याचा शोध घेण्यासाठी प्रस्ताव मागविले होते. त्यावेळी जवळपास तीन हजाराच्या आसपास प्रस्ताव प्राप्त झाल्याने प्रथम तालुकास्तरावर आणि नंतर जिल्हास्तरावर समितीतर्फे छानणी करण्यात आली. शासन निर्णयानुसार सुरूवातीला कर्जदार शेतकरी आणि सावकार हे एकाच तालुक्यातील असणे आवश्यक होते. त्यानंतर एकाच तालुक्याची असलेली ही अट शिथिल झाल्याने प्रस्तावांच्या संख्येतही किंचितशी वाढ झाली. साधारणत: सव्वा तीन हजार प्रस्तावांपैकी कर्जमाफीसाठी ५४१ प्रस्तावाला जिल्हास्तरीने समितीने मान्यता दिली. ५४१ शेतकरी सभासदांनी ७७.६८ लाख रुपयांचे सावकारी कर्ज काढले होते. या कर्जाचे व्याज १२.१८ लाख झाल्याने एकूण सावकारी कर्जाचा आकडा ८९.८६ लाखावर पोचला. यामध्ये कारंजा तालुक्यातील ३८३ शेतकर्यांनी ११ सावकाराकडून घेतलेल्या ५९.२२ लाख रुपयांच्या कर्जाचा समावेश आहे. तथापि, जिल्ह्यातील अनेक शेतकर्यांना अद्यापही या निर्णयाचा लाभ मिळाला नाही. यामध्ये वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यात इंझोरी गावाचा समावेश आहे. यामधील तब्बल ७0 शेतकर्यांनी कारंजा लाड येथील एका अधिकृत सावकाराकडून सोने, चांदी तारणावर कर्ज घेतले आहे. या सर्व शेतकर्यांचे कर्ज हे ३0 नोव्हेंबर २0१४ पूर्वीचे असल्यामुळे या शेतकर्यांना सावकारी कर्जमुक्तीचा लाभ मिळणे अपेक्षीत होते. संबंधित निबंधक कार्यालयाकडून सावकारी कर्जमुक्तीसाठी गावच्या तलाठय़ांकडून त्यांचे सात बारा, आठ अ आदि माहिती मागविली आणि ती तलाठय़ांनी सादरही केली; मात्र संबंधित सावकार मात्र या शेतकर्यांना एकाच तालुक्याची अट समोर करून बोळवण करीत आहे.
दिव्यांग शेतकर्यांच्या निवेदनाकडे दुर्लक्ष
इंझोरी येथील ५६ वर्षीय अपंग शेतकरी प्रल्हाद चव्हाण यांनी जिल्हाधिकारी, तहसीलदार, जिल्हा उपनिबंधकांकडे निवेदन सादर करून कारंजा येथील सावकाराकडून घेतलेले सावकारी कर्ज माफ करण्याची मागणी केली होती. तथापि, वारंवार निवेदन देऊनही या शेतकर्याच्या निवेदनाची दखल घेण्यात आली नाही किंवा त्याचे समाधानही करण्यात आले नाही. प्रल्हाद चव्हाण यांच्याशिवाय इतरही शेतकर्यांची अशीच परिस्थिती आहे.
-शासनाच्या निर्णयानुसार सावकार आणि कर्जदार शेतकरी हे एकाच तालुक्यातील असणे आवश्यक आहे. एकाच जिल्ह्यातील असतानाही तालुक्याबाहेरील सावकाराशी व्यवहार करून कर्ज घेणार्या शेतकर्यांना या योजनेचा लाभ देण्याची तरतूद नाही. अशी प्रकरणे केवळ वाशिमच नव्हे, तर इतरही जिल्ह्यात आहेत. वाशिम जिल्ह्यात अशी जवळपास दीडशे प्रकरणे आहेत. ही अट शिथील करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. - ज्ञानेश्वर खाडे, जिल्हा उपनिबंधक वाशिम