१0२४ पथकांद्वारे कुष्ठरुग्णांचा शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 12:55 AM2017-08-23T00:55:10+5:302017-08-23T00:57:02+5:30

वाशिम: राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गंत प्रधानमंत्री प्रगती योजनेमध्ये जिल्हय़ात कुष्ठरुग्ण शोधमोहीम ५ सप्टेंबरपासून राबविण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत १0२४ पथकाद्वारे जिल्हय़ातील ११ लाख १८ हजार ७४९ लोकसंख्येची तपासणी अभियानामध्ये करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाच्यावतीने देण्यात आली.

Leprosy discovery by 1024 Squads | १0२४ पथकांद्वारे कुष्ठरुग्णांचा शोध

१0२४ पथकांद्वारे कुष्ठरुग्णांचा शोध

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्हय़ातील ११ लाख लोकसंख्येची होणार तपासणी कुष्ठरुग्ण शोध अभियान मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गंत प्रधानमंत्री प्रगती योजनेमध्ये जिल्हय़ात कुष्ठरुग्ण शोधमोहीम ५ सप्टेंबरपासून राबविण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत १0२४ पथकाद्वारे जिल्हय़ातील ११ लाख १८ हजार ७४९ लोकसंख्येची तपासणी अभियानामध्ये करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाच्यावतीने देण्यात आली.
       सदर  मोहिमेसंदर्भात जिल्हास्तरीय समन्वय समितीची सभा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली घेऊन मार्गदर्शक सूचना व चर्चा करण्यात आली. या मोहिमेत जिल्हय़ातील ग्रामीण भागातील संपूर्ण लोकसंख्या व शहरी भागातील झोपडपट्टी भाग व काही निवडक भागचे सर्वेक्षण करण्यात येणार असून, व्यक्तींची संपूर्ण तपासणी करण्यात येणार आहे. या अभियानासाठी तयार करण्यात आलेल्या १0२४ पथकामध्ये क्षेत्रीय आरोग्य कर्मचारी, आरोग्य सहायक, सहायिका, आरोग्यसेवक, सेविका, तसेच आशा कार्यकर्ती, स्वयंसेवक यांचा प्रत्यक्ष सहभाग राहणार आहे. समाजामध्ये लपून राहिलेले कुष्ठरुग्ण लवकरात लवकर शोधून त्यांना विनाविकृती औषधोपचाराखाली आणून कुष्ठरोगाचा प्रसार खंडित करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. तसेच या मोहिमेत कुष्ठरोगाविषयी जनजागृती करून कुष्ठरोग बहुविविध औषधोपचार पद्धतीने पूर्णपणे बरा होतो, याविषयी जनजागृती करण्यात येणार आहे.  या कार्यासाठी नेमणूक केलेल्या पथकामार्फत घरोघरी जाऊन शोध घेतल्या जाणार आहे. या पथकांवर वैद्यकीय अधीक्षक, वैद्यकीय अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, आरोग्य कर्मचारी यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणाखाली त्यांच्या कार्यक्षेत्रात अभियान राबविले जाणार आहे.  सदर समितीमध्ये सहायक संचालक  डॉ. अश्‍विनकुमार हाके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकार, डॉ. एस.व्ही. मेहकरकर, अ.जि.आ. अधिकारी लोणारे, बढे, ठाकरे तसेच इतर अधिकारी व पदाधिकारी यांचा समावेश आहे. या मोहिमेला नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. 

जनजागृतीची माध्यमे
कुष्ठरोग शोधमोहिमेत विद्यार्थ्यांतर्फे जनजागृतीसह प्रभातफेरी, दवंडी, मंदिर-मशीदसह ग्रामपंचायतमार्फत ध्वनिप्रेक्षकामार्फत जनजागृती केल्या जाणार आहे.

जिल्हय़ात ५ ते २0 सप्टेंबरदरम्यान राबविण्यात येत असलेल्या कुष्ठरुग्ण शोध अभियानामध्ये प्रत्येक व्यक्तीने आपली कुष्ठरोगविषयी तपासणी करून घ्यावी. तसेच मोहीम कालावधीमध्ये आपल्या घरी येणार्‍या आरोग्य पथकास सहकार्य करून कुटुंबातील सर्व सदस्यांची तपासणी करून मोहीम यशस्वी करावी.
- डॉ. अश्‍विनकुमार हाके,
सहायक संचालक, आरोग्यसेवा वाशिम.

Web Title: Leprosy discovery by 1024 Squads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.