राष्ट्रीय सेवा योजनाच जगणे होऊ दे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2017 07:07 PM2017-10-09T19:07:14+5:302017-10-09T19:51:35+5:30
वाशीम : व्यक्तित्वाचा खरा विकास साधायचा असेल, तर राष्ट्रीय सेवा योजना हे एक उत्तम माध्यम आहे. राष्ट्रीय सेवा योजनाच जगणे सर्वांचे जगणे होऊ दे, असा संदेश प्रा. हरिभाऊ क्षीरसागर यांनी स्वयंसेवकांना दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशीम : व्यक्तित्वाचा खरा विकास साधायचा असेल, तर राष्ट्रीय सेवा योजना हे एक उत्तम माध्यम आहे. राष्ट्रीय सेवा योजनाच जगणे सर्वांचे जगणे होऊ दे, असा संदेश प्रा. हरिभाऊ क्षीरसागर यांनी स्वयंसेवकांना दिला.
सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयात सोमवारी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. प्रा. क्षीरसागर अध्यक्षस्थानी होते. जिल्हा समन्वयक डॉ. शुभांगी दामले, प्राचार्य डॉ. संजय पाटील, कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रकाश राठोड आणि मार्गदर्शक म्हणून प्रा. गजानन वाघ व्यासपीठावर उपस्थित होते.
आपल्या अध्यक्षीय मनोगतातून प्रा. क्षीरसागर यांनी राष्ट्रीय सेवा योजनेची कुळकथा सांगून उद्देश कथन केले. तत्कालीन नागपूर आणि अमरावती या दोन्ही विद्यापीठांचे रासेयो समन्वयक राहिलेल्या प्रा. क्षीरसागर यांनी आपल्या भाषणात रासेयोचे विविधांगी अनुभव यावेळी कथन केले. प्रा. गजानन वाघ यांनी राष्ट्रीय सेवा योजना आणि अंतर्बाह्य स्वच्छता या विषयावर विद्यार्थिनींशी संवाद साधला. डॉ. शुभांगी दामले यांनीही स्वयंसेविकांना मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. संजय पाटील यांनी प्रास्ताविकातून भूमिका स्पष्ट केली. नंदिनी इंगोले हिने सूत्रसंचलन केले. कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रकाश राठोड यांनी आभार मानले.