चला वाशिमला सुंदर घडवू या ...नगर परिषदेची हाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 01:56 PM2017-12-02T13:56:22+5:302017-12-02T13:59:57+5:30

वाशिम - वाशिम शहर स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी नगर परिषदेने ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार केला असून, शहरवासियांनी सहकार्य करावे, असे आवाहन नगर परिषद प्रशासनाने केले.

Let's make washim a beautiful city | चला वाशिमला सुंदर घडवू या ...नगर परिषदेची हाक

चला वाशिमला सुंदर घडवू या ...नगर परिषदेची हाक

googlenewsNext
ठळक मुद्देनगर परिषदेने ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार केला. ‘स्वच्छता अ‍ॅप’वर नागरिकांना घरबसल्या तक्रार नोंदविता येणार आहे.


वाशिम - वाशिम शहर स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी नगर परिषदेने ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार केला असून, शहरवासियांनी सहकार्य करावे, असे आवाहन नगर परिषद प्रशासनाने केले.
शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नगर परिषद प्रशासन कटिबद्ध असून, नागरिकांनीदेखील सहकार्य केल्यास शहर स्वच्छ होण्याला फारसा वेळ लागणार नाही, असा विश्वास मुख्याधिकारी गणेश शेटे यांनी व्यक्त केला. शहरातील गटार साफ नाही, कचरा उचलला नाही, सार्वजनिक शौचालय साफ नाहीत, अशा  एक ना अनेक प्रकारच्या तक्रारीसाठी आता नागरिकांना नगर परिषदेत येण्याची गरज नाही. केंद्र शासनाच्या नगरविकास खात्याने विकसित केलेल्या ‘स्वच्छता अ‍ॅप’वर नागरिकांना घरबसल्या तक्रार नोंदविता येणार आहे. कोणीही केवळ स्मार्ट फोनच्या साहाय्याने घरी बसून किंवा ये-जा करताना, शहरात फेरफटका मारताना अगदी कुठूनही विनासायास क्षणार्धात तक्रार नोंदवू शकणार आहे. ‘स्वच्छता अ‍ॅप’ वापरण्यास अगदी सुलभ आहे, अशी माहिती मुख्याधिकारी गणेश शेटे यांनी दिली. सदर अ‍ॅप डाऊनलोड केल्यानंतर पसंतीची भाषा निवडावी लागणार आहे. अ‍ॅप हा आपला मोबाईल नंबर मागेल, तो योग्य जागी नमूद करावा. तुम्हाला लगेच ‘ओटीपी’ (वन टाईम पासवर्ड) मिळेल. त्यानंतर पहिली तक्रार पोस्ट करा (पोस्ट यूवर फर्स्ट कम्प्लेंट) वर क्लिक करावे लागेल. आता अस्वच्छतेबाबत जी तक्रार नोंदवायची आहे त्या जागेचा छायाचित्र काढावे आणि नंतर सर्वसाधारणपणे आढळणाºया तक्रारी जसे मृत प्राणी आहे, कचºयाचा ढीग आहे, कचरा गाडी आली नाही, यातील जी तक्रार लागू असेल त्यावर क्लिक केल्यानंतर,  त्या परिसराचे लोकेशन व लँडमार्क ( स्थळ व लगतची ठळक खूण) टाईप करणे गरजेचे आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर स्क्रीनवर खालीच ‘पोस्ट करा’ शब्द दिसताच, त्यावर क्लिक केले की तक्रार पोहोचल्याचा संदेश दिसणार आहे, अशी माहिती मुख्याधिकारी शेटे यांनी दिली. 
तक्रार नोंदविल्यानंतर, सदर तक्रार नगर परिषदेच्या संबंधित कार्यालयाकडे आणि नंतर संबंधित क्षेत्राच्या जबाबदार कर्मचाºयांकडे पाठविली जाईल.तक्रार निवारण करून तक्रार असलेल्या जागेचा तक्रार निवारणानंतरचे छायाचित्र काढून पाठविणार आहे. सदर छायाचित्र संबंधित नागरिकाससुद्धा तात्काळ दिसणार आहे. या सर्वेक्षणात सदर अ‍ॅपचा जास्तीत जास्त वापर करणाºया शहरांसाठी विशेष गुण राखून ठेवले आहेत. वाशिम नगर परिषदेची रँक ही देशभरात २२४ अशी आहे.

Web Title: Let's make washim a beautiful city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.