कृषी विभागातील कोरोना योद्ध्यांना प्रशस्ती पत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:48 AM2021-08-20T04:48:12+5:302021-08-20T04:48:12+5:30
कोविड-१९ काळात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल वाशिमचे तत्कालीन तालुका कृषी अधिकारी अभिजीत देवगिरीकर, कृषी अधिकारी दिलीप कंकाळ, शीतल नागरे, कृषी ...
कोविड-१९ काळात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल वाशिमचे तत्कालीन तालुका कृषी अधिकारी अभिजीत देवगिरीकर, कृषी अधिकारी दिलीप कंकाळ, शीतल नागरे, कृषी पर्यवेक्षक गुणवंत ढोकणे, कृषी सहायक विजयता सुर्वे, नितीन उलेमाले, सतीश राऊत, अजय चव्हाण या कृषी विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. मंगरुळपीर तालुक्यातील कृषी सहायक विजयता सुर्वे यांंनी कोरोना काळात शेतबांधावर जाऊन शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केले. तसेच बी-बियाणे, कीटकनाशके फवारणी करताना कोणती काळजी घ्यावी, याबाबत मार्गदर्शन व सहकार्य केले. याबद्दल कृषी आयुक्तालयामार्फत प्रशस्तीपत्र पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत आमदार अमित झनक यांच्या हस्ते देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.
------
आठ अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश
कोविड काळात स्वत:च्या जीवाची पर्वा न करता कृषी विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांना सुविधा उपलब्ध केल्या. त्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी मिळून आठ जणांचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.