वाचनालयांची ‘तपासणी’ थंडावली
By Admin | Published: June 2, 2014 12:52 AM2014-06-02T00:52:36+5:302014-06-02T01:10:40+5:30
सार्वजनिक वाचनालये राहत आहेत अनुदानापुरतीच
मंगरुळपीर : वाचन संस्कृतीला बळ मिळावे, यासाठी शासनाने गाव तिथे गं्रथालय ही योजना सुरु केली. मात्र, ग्रामीण भागातील बहुतांश ग्रंथालये केवळ अनुदान लाटण्यापुरतीच सुरु असल्याचा प्रकार मंगरुळपीर तालुक्यातून परत एकदा समोर येत आहे. काही भागातील ग्रामस्थांना तर आपल्या गावामध्ये ग्रथांलय आहे, हे सुद्धा माहिती नसल्याचे चित्र आहे. गत दीड वर्षापूर्वी महसूल विभागाने पडताळणी केल्यानंतर अनेक वाचनालये सुरू झाली होती. मात्र, आता परत काही वाचनालये बंद ठेवली जात असल्याचे चित्र तालुक्यात पाहायला मिळत आहे. बंद असलेल्या वाचनालयाचा शोध घेवून अशा वाचनालयावर कारवाईं करण्याची गरज आहे. वाचाल तर वाचाल पुस्तकांच्या वाचन करण्याच्या संदर्भातील ही म्हण भाषणामध्ये आपण अनेक विदवानांच्या तोंडी ऐकतो. याच म्हणीच्या पूर्णत्वासाठी खेड्यातील विद्यार्थ्यांना व इतर लोकांना वाचनासाठी पुस्तके मिळावे यासाठी शासनाने गाव तेथे वाचनालय अशाप्रकारची योजना सुरु केली व अशा वाचनालयांना अ ब कड या दर्जाप्रमाणे अनुदानही देण्याचे घोषीत केले. त्यामुळे संबंधित गावातील अथवा परिसरातील वाचनालय संस्थाचालकांनी प्रस्तावानुसार अशा प्रकारची वाचानालये सुद्धा अनेक ठिकाणी गावपातळीवर सुरु करण्यात आली. परंतु शासनाचा वाचानालय सुरु करण्याचा उद्देश हा खेड्यातील प्रत्येकाला विविध प्रकारची पुस्तके उपलब्ध करुन देवून त्यांच्या ज्ञानामध्ये भर टाकणे हा होता. पण, अनेक ठिकाणच्या वाचनालयामध्ये पुस्तकाचा तुटवडा, वृत्तपत्राचाही पत्ता नाही एवढेच नाही तर काही वाचानालये केवळ नावापुरतीच चालविली जातात.