कारंजातील तीन कृषीसेवा केंद्रांचे परवाने निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 06:20 PM2017-10-27T18:20:28+5:302017-10-27T18:22:12+5:30

licence suspended of three agri shops in karanja | कारंजातील तीन कृषीसेवा केंद्रांचे परवाने निलंबित

कारंजातील तीन कृषीसेवा केंद्रांचे परवाने निलंबित

Next
ठळक मुद्देतालुका कृषी अधिकाºयांची कारवाईबेकायदेशीर किटकनाशके विक्रीचा परिणाम

वाशिम: यवतमाळ जिल्ह्यातील किटकनाशक फवारणी दुर्घटनेच्या पृष्ठभूमीवर वाशिम जिल्ह्यात खबरदारी म्हणून कृषीसेवा केंद्रांची झाडाझडती सुरूच आहे. या अंतर्गत कृषी विकास अधिकाºयांनी मालेगावातील सहा कृषीसेवा केंद्रांचे परवाने निलंबित केल्यानंतर कारंजा येथेही तालुका कृषी अधिकाºयांनी बेकायदेशी किटकनाशकांची विक्री करणाºया तीन कृषीसेवा केंद्रांवर धडक कारवाई करताना त्यांचे परवाने तात्काळ निलंबित केले आहेत.

यवतमाळ जिल्ह्यात किटकनाशकांची फवारणी करताना २३ शेतकºयांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आणि राज्यशासनाने कृषीसेवा केंद्रांची तपासणी करून बेकायदेशीर किटकनाशके विकणाºया कृषीसेवा कें द्रांवर कारवाई करण्याचे फर्मानच सोडले. तत्पूर्वी, वाशिम जिल्हाधिकाºयांनी यवतमाळच्या घटनेची गंभीर दखल घेत जिल्हा कृषी सेवा केंद्रांची तपासणी करून नियमबाह्य कृषी उत्पादनांची, किटनाशकांची विक्री करणाºयांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर कृषी विकास अधिकाºयांनी मालेगाव येथे सवत:च कृषीसेवा केंद्रांची पाहणी करून नियमांचे उल्लंघन करणाºया पाच दुकानांचे परवाने तात्काळ निलंबित केले होते. आता कारंजा तालुका कृषी अधिकाºयांनीही तालुक्यातील कृषीसेवा केंद्रांची पाहणी केली असता. तीन दुकानांत नियमांचे उल्लंघन करून किटकनाशकांची विक्री सुरू असल्याचे आढळून आले. त्यामुळे तालुका कृषी अधिकाºयांनी तात्काळ या तिन्ही दुकानांचे परवाने निलंबित करण्याची कारवाई केली. सालासर कृषीसेवा केंद्र, भूमी अ‍ॅग्रो, आणि व्यंकटेश कृषी सेवा केंद्र, अशी या तीन दुकानांची नावे असल्याचे तालुका कृषी अधिकारी समाधान धुळधुळे यांनी सांगितले. या कारवाईमुळे नियमांचे उल्लंघन करून किटकनाशकांची विक्री करणाºयांचे धाबे दणाणले आहे. 

Web Title: licence suspended of three agri shops in karanja

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती