जीवघेणा खड्डा; अपघाताची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:29 AM2021-06-03T04:29:24+5:302021-06-03T04:29:24+5:30
आरोग्य केंद्रातील पदे रिक्त धनज बु. : कारंजा तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयांतर्गत येणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील अनेक पदे रिक्त ...
आरोग्य केंद्रातील पदे रिक्त
धनज बु. : कारंजा तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयांतर्गत येणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील अनेक पदे रिक्त असल्यामुळे परिसरातील गोरगरिबांना उपचारात अडचणी येत आहेत. रिक्त पदे भरून रुग्णांची साेय करण्याची मागणी हाेत आहे.
मांडवा येथे सॅनिटायझर फवारणी
धनज बु. : मांडवा ग्रामपंचायत प्रशासनाने खबरदारीची उपाययोजना म्हणून स्वच्छताविषयक कामे हाती घेतली आहेत. या माध्यमातून गावात सॅनिटायझर फवारणी करण्यात येत आहे. ग्रामस्थांना काेराेना संसर्गाबाबत मार्गदर्शन केले.
रोहित्र बंद; सिंचन प्रभावित
रिठद : रिसोड तालुक्यात अनेक ठिकाणचे विद्युत रोहित्र नादुरुस्त आहेत. यामुळे सिंचनप्रक्रिया प्रभावित झाली आहे. परिणामी, भाजीपाला व फळ उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.
बीएसएनएलची सेवा अनियमित
जउळका : गेल्या आठवडाभरापासून परिसरात बीएसएनएलची दूरसंचार सेवा अनियमित आहे. वारंवार ही सेवा ठप्प होत असल्याने बँक व्यवहारांसह अन्य स्वरूपातील अडचणी जाणवत आहेत. यामुळे ग्राहकांना फटका बसत आहे.
डासांचा प्रादुर्भाव; नागरिकांत भीती
मालेगाव : शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने विविध स्वरूपातील रोगराई पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.डासांच्या प्रादूर्भावामुळे मलेरिया हाेणयची शक्यता नाकारता येत नाही. धूर फवारणी करण्याची मागणी हाेत आहे.