मुख्य रस्ता वाहून गेल्याने ग्रामस्थांचा जीव धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:44 AM2021-09-03T04:44:08+5:302021-09-03T04:44:08+5:30

तालुक्यातील १७०० लोकसंख्या असलेल्या आणि मानोरा दारव्हा या दोन तालुक्यांना जोडणाऱ्या रस्त्यावरील बोरव्हा ह्या साधारणत: आठशे ते एक हजार ...

The life of the villagers is in danger as the main road is washed away | मुख्य रस्ता वाहून गेल्याने ग्रामस्थांचा जीव धोक्यात

मुख्य रस्ता वाहून गेल्याने ग्रामस्थांचा जीव धोक्यात

Next

तालुक्यातील १७०० लोकसंख्या असलेल्या आणि मानोरा दारव्हा या दोन तालुक्यांना जोडणाऱ्या रस्त्यावरील बोरव्हा ह्या साधारणत: आठशे ते एक हजार मीटर लांबीच्या या रस्त्याची निर्मिती आणि देखभाल करणाऱ्या विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे मोठ्या प्रमाणात नादुरुस्त होऊन धोकादायक अवस्थेत पोहोचलेला आहे. बोरव्हा ह्या गावची लोकसंख्या जवळपास सतराशेच्या आसपास असून नागरिकांना दैनंदिन खासगी व शासकीय कामासाठी मानोरा आणि दारव्हा येथे ये-जा करण्यासाठी मानोरा दारव्हा रस्त्यावर यायला हाच एकमेव एक किलोमीटरचा जोड रस्ता आहे. इतर मार्ग उपलब्ध नसल्याने या जीवघेण्या रस्त्यावरून आबालवृद्ध, महिलांना ये-जा करण्याची पाळी आलेली आहे. बोरव्हा येथे पाटबंधारे विभागाचे तलाव असून या तलावाचे पाणी सदरील रस्त्यावरून नेहमी वाहत असते त्याजागी पुलाची आणि नादुरुस्त रस्ता तातडीने बांधण्याची मागणी

ग्रामपंचायत सरपंच राजेश राठोड यांनी शासन व प्रशासनाकडे केली आहे.

Web Title: The life of the villagers is in danger as the main road is washed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.