५९ वर्षांत लिंगा ग्रामपंचायत पहिल्यांदाच अविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 07:45 PM2017-10-04T19:45:00+5:302017-10-04T19:45:29+5:30
रिसोड (वाशिम): तालुक्यातील लिंगा (कोतवाल)या ग्रामपंचायतच्या स्थापनेनंतर गेल्या ५९ वर्षांत येथील ग्रामपंचायतची सार्वत्रिक निवडणुकीत प्रथमच अविरोध करण्यात आली. यात सरपंचासह सर्वच सदस्यांची मंगळवारी अविरोध निवड करण्यात आली. ग्रामपंचायत पहिल्यांदाच अविरोध सरपंच व सदस्यांची निवड झाल्यामुळे पंचक्रोशीत गावकºयांकडून समाधान व्यक्त केल्या जात आहे.
लोेकमत न्यूज नेटवर्क

ग्राम पंचायत निवडणूक म्हटली की, राजकीय मतभेदातून निर्माण होणारे वाद, तंटे, भाऊबंदकीत वाढत चाललेला व्देष हा नित्याचाच भाग होऊन बसला. यामुळे गावातील व पिडीत कुटूंबातील वाद टोकाला गेल्याचेही अनेक उदाहरणे आहेत. या वादामधून अनेकवेळा दोन गटात तुंबळ हाणामाºया सुध्दा होत असतात. परिणामी शांतता भंग होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. असा प्रकार आपल्या गावात होऊ नये यासाठी लिंगा (कोतवाल) या छोट्याशा गावातील सर्व धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन गावातील निवडणूक अविरोध करण्याचा मानस केला. निवडणूक अविरोध करण्यासाठी गावातील प्रतिष्ठीत व्यक्ती, महिला, तरूण वर्ग व भजनी मंडळींनी पुढाकार घेऊन सरपंच व सदस्यांची निवड केली. या निवडप्रक्रियेमध्ये सर्व धर्मातील नागरिकांना समसमान न्याय दिल्या गेला. यामुळे घोषीत केलेले सरपंच व सदस्य पद हे अविरोध निवडून आले.
यामध्ये सरपंचपदी शांताबाई माधवराव देशमुख, सदस्यपदी संगिताताई सुधाकरराव देशमुख, अनिता संजय देशमुख, ज्ञानेश्वर तुकारामजी देशमुख, निलेश रमेशराव देशमुख, शारदा रतन डोंगरे, भिका रामजी डोंगरे, पार्वती धनंजय डोंगरे यांचा समावेश असल्याची माहिती तहसिलदार राजू सुरडकर यांनी दिली