जिल्हय़ातील ४९५३ शेतकर्‍यांचे आधार ‘लिंकिंग’ बाकी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2017 01:57 AM2017-10-07T01:57:26+5:302017-10-07T01:57:49+5:30

वाशिम: जिल्हय़ातील पीक कर्जमाफीस पात्र शेतकर्‍यांनी  विनाविलंब आपले बँक खाते आधारकार्डांशी लिंक करावे,  असे आवाहन जिल्हा प्रशासनाने शुक्रवारी केले. वाशिम जिल्ह्यातील दि. अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक  र्मया., अकोला बँकेच्या कर्जमाफीस पात्र शेतकर्‍यांची संख्या  एकंदरित ७९ हजार १२८ असून, त्यापैकी ७५ हजार १७२ शे तकर्‍यांचे आधारकार्ड बँक खात्यांशी लिंक करण्यात आलेले  आहेत. उर्वरित ४ हजार ९५६ शेतकर्‍यांचे आधार कार्ड लिंक  करून घेणे आवश्यक आहे.

Linking is the basis of 4953 farmers in the district! | जिल्हय़ातील ४९५३ शेतकर्‍यांचे आधार ‘लिंकिंग’ बाकी!

जिल्हय़ातील ४९५३ शेतकर्‍यांचे आधार ‘लिंकिंग’ बाकी!

googlenewsNext
ठळक मुद्देबँक खाते आधार क्रमांकाशी लिंक करावे!प्रशासनाचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: जिल्हय़ातील पीक कर्जमाफीस पात्र शेतकर्‍यांनी  विनाविलंब आपले बँक खाते आधारकार्डांशी लिंक करावे,  असे आवाहन जिल्हा प्रशासनाने शुक्रवारी केले.
वाशिम जिल्ह्यातील दि. अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक  र्मया., अकोला बँकेच्या कर्जमाफीस पात्र शेतकर्‍यांची संख्या  एकंदरित ७९ हजार १२८ असून, त्यापैकी ७५ हजार १७२ शे तकर्‍यांचे आधारकार्ड बँक खात्यांशी लिंक करण्यात आलेले  आहेत. उर्वरित ४ हजार ९५६ शेतकर्‍यांचे आधार कार्ड लिंक  करून घेणे आवश्यक आहे. ज्यांचे आधार कार्ड लिंक झाले नसेल त्यांना कर्जमाफीकरिता काही अवधी  लागू शकतो. त्याचप्रमाणे राष्ट्रीयीकृत, खासगी बँका, विदर्भ  कोकण बँकेच्या पात्र सभासदांनीसुद्धा आधार कार्ड लिंक करून  घेणे आवश्यक आहे. संबंधित शेतकर्‍यांनी आपले आधार कार्ड  सेतू, सीएससी सेंटर अथवा बँकेमध्ये जाऊन लिंक करावे.  ज्यांच्याकडे आधार कार्ड नसेल त्यांनी विनाविलंब नवीन  आधार कार्ड आधार केंद्रांकडून काढून घ्यावे, असे आवाहन  जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. 

Web Title: Linking is the basis of 4953 farmers in the district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.