लॉयनेस क्लब आॅफ वाशिम, सत्यसाई सेवा संघटनाच्या वतीने मेळघाटातील १४६ आदिवासी कुटूंबांना मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 01:43 PM2018-01-24T13:43:46+5:302018-01-24T13:47:19+5:30
वाशिम : अमरावती जिल्ह्याच्या मेळघाट भागातील खटकाळी या अतिदूर्गम खेड्यांत लॉयनेस क्लब आॅफ वाशिम व सत्यसाई सेवा संघटना वाशिमच्या संयुक्त विद्यमाने अमृत कलश व धान्याचे १४६ कुटूंबाना २१ जानेवारी रोजी करण्यात आले.
वाशिम : अमरावती जिल्ह्याच्या मेळघाट भागातील खटकाळी या अतिदूर्गम खेड्यांत लॉयनेस क्लब आॅफ वाशिम व सत्यसाई सेवा संघटना वाशिमच्या संयुक्त विद्यमाने अमृत कलश व धान्याचे १४६ कुटूंबाना २१ जानेवारी रोजी करण्यात आले.
सत्यसाई सेव संघटना मागील ४ वर्षापासून सतत मेळघाटामधील खेड्यामध्ये कुपोषण, शैक्षणिक, वैद्यकीय, माता बाल संगोपन असे अनेक सामाजिक कार्य करीत आहे. खटकाळी गावातील प्राथमिक शाळा सुध्दा सत्यसाई विद्याज्योती अंतर्गत दत्तक घेतली आहे. या शाळेत मानवी जीवन मुल्यावरील शिक्षण, विद्यार्थ्यांची शारिरीक तपासणी तसेच विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती शालेय साहित्य व गणवेश पुरविण्याचे सतत कार्य चालू आहे.
एका महिन्यामध्ये २ वेळा वरील सेवाकार्य मागील ३ वर्षापासून करण्यात येत आहे. लॉयनेस क्लब आॅफ वाशिमने मेळघाट मधील कोरकू आदिवासी परिवारासाठी सेवाकार्य करण्याची तयारी दाखवुन मदतीचा हात पुढे केला व कोरकू आदिवासीसाठी हे पाऊल उचलले, मेळघाट मधील कोरकु आदिवासीसाठी सरकारी योजना खुप आहेत, पण वास्तवात मात्र त्यांच्या पर्यत कधी पोहोचतात तर कधी पोहोचतरही नाहीत ही भेटवस्तू स्विकारत असतानाही या कुटूबांच्या चेहºयावर आनंद दिसत होता.
‘आवो खुशियाँ बाटे, मनका सकून पाये’, या लॉयनेस क्लबच्या बिद्रवाक्याची अनुभूती पाहायला मिळाली हे कार्य पार पाडण्यासाठी लॉयनेस क्लबच्या अध्यक्षा डॉ.लॉ. निलीमा चव्हाण, सचिव लॉ. अमरजित कौर कपुर, खजिनदार लॉ संतोष अग्रवाल, श्रीसत्यसाई सेवा संघटना युवक विभाग व महिला विभाग यांनी परिश्रम घेतले व हे सेवा पुष्प भगवंता चरणी अर्पण केले असे सत्यसाई सेवा संघटनेचे युवा अध्यक्ष राजेश देशमुख यांनी सांगितले आहे.