खडकपूर्णा धरणात लिपिकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 12:42 AM2017-10-24T00:42:03+5:302017-10-24T00:43:42+5:30

देऊळगाव राजा:  खामगाव येथील जलसंपदा विभागातील  विजय  महल्ले रा. मोर्शी (वय ४५) यांनी संत चोखा सागर  प्रकल्पात ऐन भाऊबीजेच्या दिवशी २१ ऑक्टोबर रोजी आ त्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली

Lipika's suicide in Khadakpura dam | खडकपूर्णा धरणात लिपिकाची आत्महत्या

खडकपूर्णा धरणात लिपिकाची आत्महत्या

Next
ठळक मुद्देखामगाव येथील जलसंपदा विभागातील विजय  महल्ले भाऊबिजेच्या दिवशी चोखा सागर प्रकल्पात केली आत्महत्या

लोकमत न्यूज नेटवर्क
देऊळगाव राजा:  खामगाव येथील जलसंपदा विभागातील  विजय  महल्ले रा. मोर्शी (वय ४५) यांनी संत चोखा सागर  प्रकल्पात ऐन भाऊबीजेच्या दिवशी २१ ऑक्टोबर रोजी आ त्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली
मोर्शी जि. अमरावती येथील विजय महल्ले हे अनेक दिवसां पासून खडकपूर्णा प्रकल्पात क्लर्क म्हणून कार्यरत होते; मात्र गत  काही दिवसांपूर्वी त्यांची खामगाव येथे बदली झाली होती. त्या  ठिकाणी कार्यरत असताना त्यांनी भाऊबीजेच्या दिवशी प्रकल्प  गाठला आणि पत्नी व भाऊ यांना फोनवर माहिती दिली की, मी  ज्या ठिकाणी काम केले, त्या ठिकाणी जलसमाधी घेणार आहे.   त्यानंतर अनेक ठिकाणी त्यांचा शोध घेतला; मात्र विजय महल्ले  आढळून आले नाही. त्यानंतर त्यांच्या घरच्या मंडळींनी विजय  चव्हाण यांना संत चोखा सागर प्रकल्पावर भावाचा शोध  घेण्यासाठी पाठवले, त्या ठिकाणी चप्पल आढळून आली.  यावरून नीलेश गुलाबराव महल्ले यांनी  पोलीस स्टेशनमध्ये  तक्रार दाखल केली. दरम्यान, १९ नंबरच्या गेटवर विजय  महल्ले यांचे प्रेत आढळून आले याप्रकरणी पोलिसांनी र्मग  दाखल केला आहे.

Web Title: Lipika's suicide in Khadakpura dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा