दारू दुकानांची झाडाझडती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:48 AM2021-03-01T04:48:30+5:302021-03-01T04:48:30+5:30
जिल्ह्यात वाढत असलेल्या काेराेना पॉझिटिव्हची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने, जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत जिल्ह्यातील देशी-विदेशी दारू, ...
जिल्ह्यात वाढत असलेल्या काेराेना पॉझिटिव्हची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने, जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत जिल्ह्यातील देशी-विदेशी दारू, बार चालकांना काेराेना नियमांचे पालन करीत व्यवसाय करण्याच्या सूचना देण्यात आल्या हाेत्या. दारूविक्री करताना सुरक्षित अंतर राखणे, ग्राहकांनी मास्क लावलेले असेल, तरच दारू देणे, दुकानामध्ये फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे, बैठक व्यवस्था न ठेवणे, दर दाेन तासांनी दुकानाचा परिसर सॅनिटायझ करणे, यासह इतर सूचनांचे पालन करण्याचे सांगितले हाेते. २६ फेब्रुवारी राेजी अचानक वाशिम शहरातील ११ देशी, विदेशी दारू, बारला भेट देऊन नियमांचे पालन हाेते किंवा नाही, याची झाडाझडती घेतली. यामध्ये दाेन दुकानदारांकडून नियमांचे उल्लंघन हाेत असल्यावरून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली, तर इतर ५ ते ६ जणांना नियमांचे पालन करण्याची ताकीद देण्यात आली. यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक अतुल कानडे यांनी स्वत:हून दुकानाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासाेबत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती हाेती.
---------------
काेराेना संसर्ग पाहता, प्रत्येक दारू अनुज्ञाप्तीधारकांनी दिलेल्या नियमांचे पालन करावे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्याची हयगय केली जाणार नाही. वाशिम शहरातील ज्या अनुज्ञाप्तीधारकांना भेटी दिल्यात, त्यांना पुन्हा आकस्मित भेटी दिल्या जातील. यावेळी नियमांचे पालन केल्याचे न दिसल्यास कडक कारवाई केल्या जाईल. जिल्ह्यातील सर्वच अनुज्ञाप्तीधारकांनी काेराेना नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे.
- अतुल कानडे
अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, वाशिम