नुकसानीच्या यादीतून गारपीटग्रस्तांना डावलले
By admin | Published: July 3, 2014 11:22 PM2014-07-03T23:22:51+5:302014-07-04T00:05:01+5:30
गारपिटीत नुकसान यादीतून जवळपास ४0 शेतकर्यांना हेतुपरस्पर वगळल्यामुळे संतप्त शेतकर्यांनी कार्यवाहीचे निवेदन दिले.
आसेगाव: नांदगाव येथील शेतकर्यांना फेब्रुवारी मार्च महिन्यात झालेल्या गारपिटीत नुकसान यादीतून जवळपास ४0 शेतकर्यांना हेतुपरस्पर तलाठी मनवर कृषी सहाय्यक उईके वगळल्यामुळे संतप्त नांदगाव येथील शेतकर्यांनी तहसिलदार अरखराव यांना संबंधितावर शिस्तभंगाची कार्यवाहीचे निवेदन दिले.
सदर निवेदनात ज्यांच्या शेतामध्ये कोणतेही ओलीत नव्हते अशा लोकांची नावे यादीमध्ये आहेत परंतु जि खर्या गारपीटग्रस्त शेतकर्यांची नापवे सदर यादीमधून वगळण्यात आली आहेत गारपिटग्रस्त शेतकर्यांच्या शेतामध्ये कोणताही अधिकारी सर्व पंचनामा करण्याकरिता आतापर्यंत आलेले नाहीत सदर सर्वे पचंनामा अधिकार्यांनी घरी बसून करण्यात आले आहेत
ज्या अधिकार्यांनी खोटे सर्वे पंचनामे केले त्यांच्यावर आपण कडक कायदेशिर कार्यवही करावी गारपिटीचे नुकसान मिळाले नाही तर संपूर्ण गावातील शेतकरी आंदोलात्क पवित्रा घेवून येत्या काही दिवसात आमरण उपोषण करणार असल्याचे नमुद केले यावेळी गावातील पांडूरंग ठाकरे, राजपाल खडसे, नंदलाल ठाकरे, कडूजी वर्हाडे, सिताराम सानप, नामदेव सानप इत्यादीसह शेकडो शेतकर्यांनी तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले.