जिल्हय़ात साक्षरतेचा टक्का वाढतोय!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2017 01:27 AM2017-09-07T01:27:43+5:302017-09-07T01:27:51+5:30
वाशिम : जिल्ह्यातील साक्षरतेचा टक्का वाढला असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. २00१ मध्ये असलेला ७३.४ चा आकडा २0१६ मध्ये ८६ टक्क्यांच्यावर पोहोचला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यातील साक्षरतेचा टक्का वाढला असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. २00१ मध्ये असलेला ७३.४ चा आकडा २0१६ मध्ये ८६ टक्क्यांच्यावर पोहोचला आहे.
जनतेत शिक्षणाबाबत जागरूकता निर्माण करून लिहिण्या-वाचण्याचे महत्त्व पटवून देणे, स्वत:चे अधिकार कळावे, तसेच त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण व्हावा, या उद्देशाने युनेस्को या आंतरराष्ट्रीय संस्थेकडून ८ सप्टेंबर रोजी जगभरात साक्षरता दिवस साजरा करण्यात येतो.
कोणत्याही देशाची साक्षरता ही त्या देशाच्या विकासाचा पाया असतो. साक्षरतेचे प्रमाण वाढवून देशाचा विकास साधण्यासाठी सरकारच्यावतीने विविध शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येतात. साक्षरता दिवसाच्या निमित्ताने वाशिम जिल्हय़ातील साक्षरतेचे प्रमाण जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता जिल्हय़ातील साक्षरतेचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येते. २00१ ते २0१६ या कालावधीत जिल्हय़ाच्या साक्षरता प्रमाणात वाढ झाली आहे. वाशिम तालुक्यात २00१ मध्ये साक्षरतेचे प्रमाण ७२.४४ होते, तर २0११ मध्ये हेच प्रमाण ८१. ९१ टक्के झाले. २0१६ मध्ये हेच प्रमाण ८३.४0 टक्के झाले.
रिसोड तालुक्यामध्ये २00१ ला साक्षरतेचे प्रमाण ७१.0२ होते. यामध्ये २0११ पर्यंतच्या कालावधीत या तालुक्यातील साक्षरता ८0.0६ टक्क्यांवर आली. २0१६ मध्ये ८२.५0 टक्के झाली. मालेगाव शहरात २00१ मध्ये साक्षरतेचे प्रमाण ७0.२७ होते, तर २0११ पर्यंत हे प्रमाण ८0.९४ वर आणि २0१६ मध्ये ८२ टक्क्यांच्यावर आले. मानोरा तालुक्यात २00१ ला ७0.१२, असे साक्षरतेचे प्रमाण होते. त्यामध्ये २0११ पर्यंत ७७.९२ टक्के आणि २0१६ मध्ये ७९ टक्के अशी वाढ झाल्याचे दिसून येते. २00१ मध्ये महिलांची साक्षरता ६0.0६ अशी होती. २0१६ मध्ये ७६.0२ टक्के अशी वाढ झाली.