साहित्य लिहले जाते पण वाचले जात नाही - गजानन अमदाबादकर, मानोरा येथे काव्यसंग्रहाचे प्रकाशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 04:27 PM2017-11-22T16:27:23+5:302017-11-22T16:28:04+5:30
मानोरा : साहित्य लिहीले मात्र वाचले जात नाही अशी खंत शेतकरी नेते तथा जि.प.सदस्य गजानन अमदाबादकर कारंजा यांनी व्यक्त केली.
मानोरा : शेतकºयांचे दु:ख, त्याच्या समस्या अफाट आहे.त्या साहित्यातुन मांडल्या जातात. गजानन घुबडे यांच्या जय हो बळीराजा या काव्यसंग्रहात शेतकºयांच्या वेदना व्यक्त झाल्या. साहित्य लिहीले मात्र वाचले जात नाही अशी खंत शेतकरी नेते तथा जि.प.सदस्य गजानन अमदाबादकर कारंजा यांनी व्यक्त केली.
मानोरा येथे रविवारी १९ रोजी कवि गजानन घुबडे यांच्य जय हो बळीराजा या काव्यसंग्रहाचे प्रकाशन अमदाबादकर यांचेहस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
पंचायत समितीच्या आवारात असणाºया सेवानिवृत्त शिक्षकांच्या सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी सत्यशोधकी साहित्य, संस्कृती आणि संशोधन परिदेचे अध्यक्ष सतिष जामोदकर होते. अंकुर साहित्य संघ वाशिम जिल्हाध्यक्ष दिपक राऊत,अ.भा.अंनिसचे तालुकाध्यक्ष प्रा.विलास गांजरे, शेतकरी लेखक संभाजीराव टेटर, अंकुर साहित्य संघ मंगरुळपीरचे अध्यक्ष बाळासाहेब हवा, लोककलावंत संजय कडोळे कारंजा, कवयीत्री विमलताई वाघमारे आदि उपस्थित होते. याप्रसंगी प्रथम मान्यवरांनी क्रांतीज्योती सवित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन केले. यावेळी प्रा.विलास गांजरे, संजय कडोळे, रमेश नागापुरे, विमलताई वाघमारे, संभाजीराव टेटर, दिपक राऊत, यांनी सुध्दा मनोगत व्यक्त् केले व घुबडे यांच्या काव्य संग्रहाची प्रशंशा केली. कवी गजानन घुबडे यांनी आपले मनोगत व्यक्त करुन काव्यसंग्रह कसा प्रसवला याबाबत माहिती दिली. अध्यक्षीय भाषणात सतिष जामोदकर म्हणाले की, घुबडे यांची कविता वास्तववादी आहे. शेती व शेतकरी हा त्यांच्या कवितांचा विषय असुन त्यांनी जे भोगलं ते लिहंल आहे. अंकुर साहित्य संघ शाखा कारंजाचे अध्यक्ष रामहरी पंडीत यांनी प्रास्ताविक भाषण करुन या काव्यसंग्राहाचे रसग्रहण केले. सुत्रसंचालन अंकुर मानोराचे सचिव माणिक डेरे यांनी केले. किरण मनवर यांनी उपस्थितांचे आभार मानले.यावेळी अंकुर परिवारासह नाट्यपरिषद शाखेचे सभासद व साहित्यप्रेमी नागरिक उपस्थित होते.(प्रतिनिधी)