मुख्य रस्ता वाहून गेल्याने ग्रामवासीयांचे जीव धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:30 AM2021-09-02T05:30:04+5:302021-09-02T05:30:04+5:30
तालुक्यातील सतराशे लोकसंख्या असलेल्या आणि मानोरा दारव्हा या दोन तालुक्यांना जोडणाऱ्या रस्त्यावरील बोरव्हा ह्या साधारणता आठशे ते एक हजार ...
तालुक्यातील सतराशे लोकसंख्या असलेल्या आणि मानोरा दारव्हा या दोन तालुक्यांना जोडणाऱ्या रस्त्यावरील बोरव्हा ह्या साधारणता आठशे ते एक हजार मीटर लांबीच्या या रस्त्याची निर्मिती आणि देखभाल करणाऱ्या विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे मोठ्या प्रमाणात नादुरुस्त होऊन धोकादायक अवस्थेत पोहोचलेला आहे. बोरव्हा ह्या गावची लोकसंख्या जवळपास सतराशेच्या आसपास असून नागरिकांना दैनंदिन खासगी व शासकीय कामासाठी मानोरा आणि दारव्हा येथे ये-जा करण्यासाठी मानोरा दारव्हा रस्त्यावर यायला हाच एकमेव एक किलोमीटरचा जोड रस्ता आहे. इतर मार्ग उपलब्ध नसल्याने या जीवघेण्या रस्त्यावरून आबालवृद्ध, महिलांना ये-जा करण्याची पाळी आलेली आहे. बोरव्हा येथे पाटबंधारे विभागाचे तलाव असून या तलावाचे पाणी सदरील रस्त्यावरून नेहमी वाहत असते त्याजागी पुलाची आणि नादुरुस्त रस्ता तातडीने बांधण्याची मागणी
ग्रामपंचायत सरपंच राजेश राठोड यांनी शासन व प्रशासनाकडे केली आहे.