पशुधन पर्यवेक्षकांच्या संपामुळे पशुपालक अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:37 AM2021-07-26T04:37:52+5:302021-07-26T04:37:52+5:30
गेल्या १६ जुलैपासून खासगी पदविकाधारक तथा पशुधन पर्यवेक्षकांचे काम बंद आंदोलन सुरू असल्याने गुरांचे लसीकरण तसेच उपचार करण्यात अडचणी ...
गेल्या १६ जुलैपासून खासगी पदविकाधारक तथा पशुधन पर्यवेक्षकांचे काम बंद आंदोलन सुरू असल्याने गुरांचे लसीकरण तसेच उपचार करण्यात अडचणी येत असून, ग्रामीण भागात कार्यरत पशुधन विकास अधिकाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे. आजारी जनावरांवर योग्यवेळी उपचार मिळत नसल्याने ग्रामीण भागातील पशुपालकांची होत असलेली परवड थांबविण्यासाठी पशुधन विकास अधिकाऱ्यांची मोठी तारांबळ उडत असल्याचे ग्रामीण भागात पाहावयास मिळत आहे.
विशेष महत्त्वाचे म्हणजे पशुधन विकास अधिकाऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर रिक्त जागा असल्याने निवडक प्रमाणात असलेल्या पशुधन विकास अधिकाऱ्यावर सेवा देताना मोठा ताण पडत असल्याने पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या रिक्त जागा त्वरित भरण्याची मागणी पशुपालकांच्या वतीने पुढे येत आहे.