भारनियमनाचा जिल्हाभरात विरोध; शेतकरी, भाविकांत संताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 01:33 PM2018-10-13T13:33:23+5:302018-10-13T13:33:39+5:30
वाशिम: महावितरणच्यावतीने वीजतुटीसह इतर कारणे समोर करून ऐन दूर्गोत्सवातच मोठ्या प्रमाणात भारनियमन सुरू केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: महावितरणच्यावतीने वीजतुटीसह इतर कारणे समोर करून ऐन दूर्गोत्सवातच मोठ्या प्रमाणात भारनियमन सुरू केले आहे. यामुळे दूर्गाेत्सवावर वीरजन पडले आहे, तसेच शेतकºयांना सिंचनात अडचणी येत असून, रिसोड, वाशिम, मानोरा, मालेगाव तालुक्यासह जिल्हाभरातील दूर्गोत्सव मंडळाच्या पदाधिकाºयांसह राजकीय पुढाºयांनी महावितरणकडे या संदर्भात निवेदन सादर करून भारनियमन रद्द करण्याची मागणी केली आहे.
रिसोड येथील दूर्गोत्सव मंडळाचे सदस्य, सामाजिक कार्यकर्त्यांनी महावितरणच्या अभियंत्यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले की, सध्या सर्वत्र नवरात्रौत्सव सुरू आहे. या उत्सवादरम्यान रात्रीला दूर्गा मंडळ व मंदिरावर विविध धार्मीक कार्यक्रमासह दांडिया खेळला जातो. नेमके याच वेळी महावितरण कंपनीने भारनियमन सुरू केले आहे. त्यामुळे भाविकांची गैरसोय होत आहे. ही बाब लक्षात घेऊन रात्रीचे भारनियमन बंद करावे. अन्यथा महावितरणच्या कार्यालयास ताला ठोको आंदोलन करण्यात येईल. निवेदनावर माजी नगराध्यक्ष किरण क्षीरसागर, भागवत गवळी, अमोल लोथे, सारंग निर्बाण, प्रदिप घायाळ, मुन्ना जैन, ज्ञानेश्वर पवार,रिंकु थोरात आदिंच्या स्वाक्षरी आहेत. वाशिम येथील राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीनेही महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना निवेदन सादर करताना शेतकºयांना रब्बी हंगामात येणाºया अडचणी लक्षात घेत वाशिम तालुक्यातील भारनियमन बंद करून पूर्णवेळ वीज पुरवठा सुरू ठेवण्यासह कळंबा महाली फिडरवर मंजूर रोहित्रही तात्काळ बसिवण्याची मागणी केली आहे. यावर राकॉ तालुका युवक राकॉ अध्यक्ष शिवाजी महाले, तालुकाध्यक्ष संजय मापारी, शहरअध्यक्ष शेख ताजू ठेकेदार, जिल्हाध्यक्ष सामाजिक न्याय विभाग विनोद पट्टेबहाद्दूर, युवक राकाँ जिल्हाउपाध्यक्ष प्रमोद चौधरी, युवक तालुका उपाध्यक्ष वैभव एकाडे आदिंची स्वाक्षरी आहे.