केवळ ३४० शेतक-यांना तातडीच्या कर्जाचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2017 03:04 AM2017-08-07T03:04:41+5:302017-08-07T03:36:08+5:30

loan waiver benefit for mere 340 farmers | केवळ ३४० शेतक-यांना तातडीच्या कर्जाचा लाभ

केवळ ३४० शेतक-यांना तातडीच्या कर्जाचा लाभ

Next
ठळक मुद्देकर्जमाफीची ‘आॅनलाइन’ प्रक्रियाही वांध्यात!वाशिम जिल्ह्यातील वास्तव

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: शासनाने शेतकºयांना तातडीच्या १० हजार रुपये कर्जाचा पुरवठा करण्याचे निर्देश दिले असून, ३१ आॅगस्ट ही त्याची अंतिम मुदत आहे. असे असताना बँकांनी  अवलंबिलेल्या ढिसाळ धोरणामुळे जिल्ह्यात शनिवार, ५ आॅगस्टपर्यंत केवळ ३४० शेतकºयांनाच या योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळू शकला आहे. याशिवाय कर्जमाफीची ‘आॅनलाइन’  प्रक्रियाही ‘सर्व्हर डाउन’ची समस्या आणि ‘नेट कनेक्टिव्हिटी’अभावी वांध्यात सापडल्याने शेतकºयांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
राज्य शासनाने जाहीर केलेल्या पीक कर्जमाफीच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीस वेळ लागणार असल्याने शेतकºयांना खरीप हंगामातील पिकांसाठी आवश्यक खत, कीटकनाशक  खरेदीसाठी १० हजार रुपये अग्रिम कर्ज उपलब्ध करून देण्यासंदर्भात शासनाने १४ जून २०१७ रोजी आदेश काढला; परंतु अनेक बँकांनी त्याची अंमलबजावणी अद्याप केलीच नाही. प्रशासनाकडून मिळालेल्या ताज्या आकडेवारीनुसार, ५ आॅगस्टपर्यंत विदर्भ ग्रामीण कोकण (२१९ शेतकरी) आणि अकोला जिल्हा मध्यवर्ती (५८ शेतकरी) या दोन बँकांनी २७७ शेतकºयांना २७ लाख ७० हजार रुपये अग्रिम कर्जापोटी वाटप केले. हा अपवाद वगळता जिल्ह्यातील इतर सर्व बँकांनी मिळून केवळ ६३ शेतकºयांना ६३ हजार रुपये कर्जवाटप केल्याची गंभीर स्थिती आहे. दरम्यान, तातडीच्या १० हजार रुपये अग्रिम कर्जवाटपाची शेवटची मुदत ३१ आॅगस्ट २०१७ असून, शेवटच्या तारखेपर्यंतही या आकड्यात फारशी वाढ होणार नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

Web Title: loan waiver benefit for mere 340 farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.