दोन लाखांपर्यंतच्या कर्जमुक्ती योजनेच्या ताळेबंदाची लगबग!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2019 03:52 PM2019-12-29T15:52:47+5:302019-12-29T15:52:58+5:30
जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरिय समितीची बैठक घेण्यात येणार असून, १५ दिवसात आॅडिट पूर्ण केले जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : राज्यशासनाने शेतकऱ्यांना २ लाखांपर्यंत कर्जमाफी देण्याची घोषणा केली आहे. या घोषणेनुसार वाशिम जिल्हयात किती शेतकरी पात्र ठरलीत आणि नेमकी किती कर्जमाफी होईल, याचा हिशोब जुळविण्याची लगबग प्रशासनाकडून सुरु झाली आहे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरिय समितीची बैठक घेण्यात येणार असून, १५ दिवसात आॅडिट पूर्ण केले जाणार आहे.
राज्यभरातील शेतकºयांचे ३० सप्टेंबर २०१९ पर्यंतचे तथा दोन लाख रुपयांपर्यंतचे थकीत कर्ज माफ करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवार, २१ डिसेंबर रोजी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ची घोषणा विधानसभेत केली. या योजनेअंतगर्गत ज्या शेतकºयांकडे १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ पर्यंत उचल केलेल्या एक किंवा एकापेक्षा जास्त ज्या कर्जखात्यात अल्पमुदती पीक कर्जाची ३० सप्टेंबर २०१९ रोजी मुद्दल व व्याजासह थकीत असलेली व परतफेड न झालेली रक्कम २ लाखांपर्यंत आहे. अशा शेतकºयांचे अल्प, अत्यल्प भूधारक याप्रकारे जमीन धारणेचे क्षेत्र विारात न घेता त्यांच्या कर्जखात्यात २ लाखापर्यंतची रक्कम जमा करण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ पर्यंत वाटप केलेल्या अल्पमुदती पीक कर्जाचे पुनर्गठन, फेर पुनर्गठन करून मध्यम मुदती कर्जात रुपांतरीत केलेल्या किंवा एकापेक्षा जास्त ज्या कर्ज खात्यात ३० सप्टेंबर २०१९ रोजी मुद्दल व व्याजासह थकीत असलेल्या व परतफेड न झालेल्या हप्त्याची रक्कम २ लाखांपर्यंत असल्यास त्यांनाही कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे. सदर योजनेमध्ये उपरोक्त नमूद केल्याप्रमाणे अल्पमुदती पीक कर्ज व अल्पमुदती पीक कर्जाचे केलेले पुनर्गठीत, फेर पुनर्गठीत कर्ज यांची ३० सप्टेंबर २०१९ रोजी वैयक्तीक शेतकºयांच्या सर्व कर्जखात्यांची एकत्रित थकबाकीची रक्कम विचारात घेऊन प्रती शेतकरी कमाल २ लाख मर्यादेपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे. त्यानुसार, जिल्ह्यातील पात्र शेतकºयांची माहिती गोळा करण्याची लगबग प्रशासनाने सुरू केली आहे. यासाठी जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तर समितीची बैठक सोमवार, ३० डिसेंबर रोजी आयोजित केली असून, या बैठकीत सर्व मुद्यांवर चर्चा केली जाणार आहे. त्यानंतर १५ जानेवारीपर्यंत शेतकºयांच्या कर्जखात्याचे आॅडिट करून तसा अहवाल विभागीय समितीमार्फत शासनाकडे सादर करण्यात येणार आहे.
शासन निर्णयानुसार २ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमुक्तीसाठी पात्र शेतकºयांची यादी गोळा करण्याची तयारी करण्यात आली आहे. यासाठी जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तर समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले असून, बैठकीनंतर १५ दिवसांत शेतकºयांच्या कर्जखात्याचे आॅडिट केले जाईल.
- रमेश कटके
जिल्हा उपनिबंधक तथा सचिव
जिल्हास्तर समिती, वाशिम