‘कर्जमाफी’चे संकेतस्थळ बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 02:48 AM2017-07-29T02:48:17+5:302017-07-29T02:48:55+5:30

loan waivers links downs; washim district | ‘कर्जमाफी’चे संकेतस्थळ बंद!

‘कर्जमाफी’चे संकेतस्थळ बंद!

googlenewsNext
ठळक मुद्दे बँकेत जाऊन आॅफलाइन पद्धतीने भरावे लागणार अर्जशेतक-यांची तारांबळ :

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : शासनाच्या निर्देशानुसार, कर्जमाफीस पात्र असलेल्या शेतकºयांकडून आॅनलाइन पद्धतीने अर्ज नोंदणीस जिल्ह्यात २५ जुलैपासून सुरुवात झाली; मात्र तांत्रिक कारणामुळे सदर संकेतस्थळ बंद असल्याने आॅफलाइन पद्धतीने संबंधित बँकांमध्ये शेतकºयांना अर्ज सादर करण्याची वेळ येत आहे.
राज्य शासनाने २१ जून २०१७ रोजीच्या शासन निर्णयानुसार, जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेनुसार कर्जमाफी मिळविण्यासाठी पात्र शेतकºयांनी आॅनलाइन स्वरूपातील अर्ज व घोषणापत्रे सादर करणे आवश्यक आहे. त्यासाठी आधार क्रमांक सादर करणे बंधनकारक आहे. शेतकºयांच्या सोयीसाठी जिल्ह्यातील सर्व महा ई-सेवा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्रांवर आॅनलाइन अर्ज व घोषणापत्र भरण्याची सुविधा मोफत स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. याची अंतिम मुदत ३१ आॅक्टोबर २०१७ अशी आहे. तांत्रिक कारणामुळे सदर आॅनलाइन सुविधा अद्यापही वाशिम जिल्ह्यात आॅफलाइन असल्याचे दिसून येते.
शासनाच्या कर्जमाफीच्या निर्णयानंतर वेळोवेळी आलेल्या तांत्रिक अडचणींमुळे शेतकºयांना शासनाच्या निर्णयाचा प्रत्यक्ष फायदा होण्यास बराच विलंब लागत आहे. सुरुवातीला सन २०१२-१३ ते २०१५-१६ या वर्षात पीक कर्ज काढणारे; परंतु ३० जून २०१६ पर्यंत कर्ज थकीत असणाºया शेतकºयांना दीड लाख रुपये मर्यादेपर्यंत कर्जमाफीचा लाभ देण्याचा शासन निर्णय झाला. त्यानंतर सन २००९-१० पासून ते ३० जून २०१६ पर्यंत कर्ज थकीत असणाºया शेतकºयांनादेखील दीड लाख रुपये मर्यादेपर्यंत कर्जमाफी देण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यानुसार आता प्रत्यक्ष कर्जमाफीस पात्र असलेल्या शेतकºयांचे आॅनलाइन पद्धतीने अर्ज भरून घेण्याला सुरुवात झाली आहे. शासनाच्या ‘आपले सरकार’ या संकेतस्थळावर किंवा डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू डॉट सीएसएमएसएसवाय डॉट इन या संकेतस्थळावर शेतकºयांना कर्जमाफीसंदर्भात आॅनलाइन अर्ज सादर करावे लागणार आहेत. सदर संकेतस्थळ बंद असल्याने शेतकºयांची गैरसोय होत आहे. गत तीन दिवसांपासून जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने महा ई-सेवा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्रांवर अर्ज भरण्यासाठी जात आहेत; मात्र संकेतस्थळ बंद असल्याने शेतकºयांना परत यावे लागत आहे.
दुसरीकडे संबंधित बँकेत शेतकºयांना आॅफलाइन पद्धतीने कर्जमाफीसंदर्भातील अर्ज भरता येणार आहेत. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनीदेखील वाशिम शहरातील काही बँकांना भेट देऊन आॅफलाइन पद्धतीने कर्जमाफीसंदर्भातील अर्ज स्वीकारण्याच्या पद्धतीची माहिती घेतली. आॅफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याच्या सूचना द्विवेदी यांनी केल्या. पात्र शेतकºयांना आॅनलाइन किंवा आॅफलाइन यापैकी कोणत्याही एका स्वरुपात अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

Web Title: loan waivers links downs; washim district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.