५१ लाभार्थींना २.८२ कोटींचे कर्ज मंजूर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2020 04:22 PM2020-10-07T16:22:46+5:302020-10-07T16:22:57+5:30
Washim News जिल्ह्यात ५१ लाभार्थ्यांना २ कोटी ८२ लाख २७ हजार रुपये कर्ज मंजूर करण्यात आले.
वाशिम : मराठा समाजातील उद्योजक बनू इच्छिणाºया आर्थिकदृष्ट्या मागास ५१ लाभार्र्थींना अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळांतर्गत विविध बँकांमार्फत २ कोटी ८२ लाख २७ हजार रुपये कर्ज मंजूर झाले असून, ४० कर्ज प्रकरणांवर कार्यवाही सुरु आहे.
मराठा समाजातील उद्योजक बनू इच्छिणाºया आर्थिकदृष्ट्या मागास युवक-युवतींना अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत कर्ज प्रकरणे मंजूर केली जातात. तत्पूर्वी छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियानांतर्गत संमतीपत्र घेण्यात येतात. बँकेचे नियमित हप्ते भरणाºयांना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून व्याज परतावा दिला जातो. आतापर्यंत जिल्ह्यातील २४ लाभार्थ्यांना १२ लाख ४६ हजार रुपये व्याज परतावासुद्धा देण्यात आलेला आहे. महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी उमेदवार महाराष्ट्राचा रहिवाशी तसेच मराठा प्रवर्गातील आणि टीसीवर मराठा नोंद किंवा ईएसबीसी जातीचे प्रमाणपत्र अनिवार्य आहे. उमेदवाराने अर्ज करताना या प्रकल्पासाठी व यापूर्वी महामंडळाच्या व इतर महामंडळांच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा. कर्ज प्रकरण हे सीबील प्रणाली अथवा तत्सम प्रणाली सदस्य असलेल्या बँकेत करणे आवश्यक आहे. जिल्ह्यात ५१ लाभार्थ्यांना २ कोटी ८२ लाख २७ हजार रुपये कर्ज मंजूर करण्यात आले.४० कर्ज प्रकरणांवर कार्यवाही सुरु आहे, असे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त सुनंदा बजाज यांनी सांगितले. शासनाच्या संकेतस्थळावर ‘इंटरप्रिनरशीप’ या टॅबचा वापर करून नोंदणी करावी, असे आवाहनही त्यांनी केले.