लॉकडाउनमुळे निंबु उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2020 04:29 PM2020-05-05T16:29:17+5:302020-05-05T16:29:27+5:30
जिल्हयाबाहेर जाण्यासाठी करावी लागत असलेल्या कसरतीमुळे निंबु उत्पादक शेतकºयांच्या अडचणी वाढल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा : लाखो रुपये खर्च करून तालुक्यातील कारखेडा येथील शेतकºयांने निंबुची झाडे जगवीली, परंतु लॉकडाउनमुळे निंबुला शेतात सडण्याची पाळी आली असून यामुळे शेतकºयांच्या अडचणी वाढल्या आहेत. कारण मानोरानजिक केवळ दिग्रस येथेच निंबुची मोठी बाजारपेठ आहे परंतु जिल्हयाबाहेर जाण्यासाठी करावी लागत असलेल्या कसरतीमुळे निंबु उत्पादक शेतकºयांच्या अडचणी वाढल्या आहेत.
कारखेडा येथील शेतकरी गोपाल जयवंतराव सोळंके यांनी सहा एकर शेतीत निंबुची झाडे लावुन ती जगवली. सहा एकर शेतीत या वर्षी किमान पाच लाख रुपये उत्पन होईल असे नियोजन करण्यात आले होते . ऐन् वेळी उन्हाळ्याची चाहूल लागताच निंबु विक्रीला सुरवात झाली ना झाली देशात लॉकडाऊन सुरू झाल्यामुळे निंबु शेतातच सडण्याची पाळी आली असल्याने निंबु उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे.
निंबुची बाजारपेठ दिग्रसला
मानोरा येथून जवळ असलेल्या यवतमाळ जिल्हयातील दिग्रस येथे निंबुची चांगली बाजारपेठ आहे. दरवर्षी मानोरा तालुक्यातील अनेक शेतकरी दिग्रस येथे निंबु विक्रीस नेतात. यावेळी कारोनो पृष्ठभूमिवर लॉकडाउन असल्याने व यवतमाळ जिल्हयात कोरोना रुग्ण आढळल्याने दिग्रसला जाणे शक्य नसल्याने शेतकºयांचे नुकसान होत आहे.