बॅरेज परिसरातील विद्युत उपकेंद्रांची कामे ‘लॉकडाऊन’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 12:31 PM2020-08-10T12:31:19+5:302020-08-10T12:31:35+5:30
लॉकडाऊनपूर्वी चार विद्युत उपकेंद्राची कामे पूर्ण झाली तर आठ विद्युत उपकेंद्रांची कामे अपूर्ण राहिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यात पैनगंगा नदीवर ११ ठिकाणी बॅरेजची निर्मिती होऊन अडीच वर्षाचा कालावधी लोटला आहे. विद्युतचे जाळे निर्माण करण्यासाठी ११ विद्युत उपकेंद्र मंजूर आहेत. लॉकडाऊनपूर्वी चार विद्युत उपकेंद्राची कामे पूर्ण झाली तर आठ विद्युत उपकेंद्रांची कामे अपूर्ण राहिली. लॉकडाऊनचा फटका या उपकेंद्रांच्या कामांना बसत असल्याने रब्बी हंगाम सुरू होण्यापूर्वी ही कामे पूर्ण होण्याची शक्यता कमी असल्याने, यंदाच्या रब्बी हंगामात सिंचनापासून वंचित राहण्याची भीती शेतकऱ्यांमधून वर्तविण्यात येत आहे.
शेतीला सिंचनाची जोड मिळाली यासाठी ७१६.४२ कोटी रुपये खर्चून पैनगंगा नदीवर अडगाव, गणेशपूर, कोकलगाव, ढिल्ली, उकळीपेन, जुमडा, राजगाव, टणका, जयपूर, सोनगव्हाण, वरूड असे ११ ठिकाणी ‘बॅरेजेस’ची कामे पूर्ण होऊन अडीच वर्षांपेक्षा अधिक कालावधी उलटला. मात्र, पुरेशा प्रमाणात विद्युतचे जाळे निर्माण झाले नसल्याने रब्बी हंगामात सिंचन करताना शेतकऱ्यांना गैरसोयीला सामोरे जावे लागते. ११ विद्युत उपकेंद्रांपैकी चार कामे पूर्ण झाली तर उर्वरीत कामे अपूर्ण आहेत.
बॅरेज तुडूंब; पण विद्युतचे काय?
जिल्ह्यात यावर्र्षी बºयापैकी पाऊस पडत असल्याने अकराही बॅरेज पाण्याने तुडूंब आहेत. त्यामुळे रब्बी हंगामात बºयापैकी जलसाठा उपलब्ध होण्याची आशा शेतकरी बाळगून आहे. परंतू, विद्युत उपकेंद्राची कामे पूर्ण झाली नाही तर सिंंचन कसे करावे? असा प्रश्न शेतकºयांना पडला
लॉकडाऊनचा फटका
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात २४ मार्चपासून लॉकडाऊन आहे. मार्च ते मे या तीन महिन्यात या कामावरील मजूरही आपापल्या गावी परतले. त्यामुळे कामे ठप्प पडली होती. आता मजूर उपलब्ध झाल्याने उर्वरीत बॅरेजची कामे सुरू आहेत. परंतू कामाची गती संथ आहे.
बॅरेज परिसरात ११ विद्युत उपकेंद्रांची कामे मंजूर आहेत. काही उपकेंद्रांची कामे पूर्ण झालेली आहेत. उर्वरीत कामे संबंधित कंत्राटदारांकडून सुरू आहेत. विद्युत उपकेंद्रांची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.
- राहूल बोरीकर, अधीक्षक अभियंता, महावितरण