‘लॉकडाऊन’; रिसोड, मालेगाव, मंगरूळपीर शहरात उत्स्फुर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2020 12:52 PM2020-07-15T12:52:00+5:302020-07-15T12:52:16+5:30

रिसोड, मंगरूळपीर येथे १५ जुलैपासून लॉकडाऊन तर मालेगाव येथे जनता कर्फ्यू असल्याने बुधवारी या तिन्ही शहरात शुकशुकाट दिसून आला.

‘Lockdown’; Spontaneous response in Risod, Malegaon, Mangrulpeer city | ‘लॉकडाऊन’; रिसोड, मालेगाव, मंगरूळपीर शहरात उत्स्फुर्त प्रतिसाद

‘लॉकडाऊन’; रिसोड, मालेगाव, मंगरूळपीर शहरात उत्स्फुर्त प्रतिसाद

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने, कोरोनाची साखळी तोडण्याचा प्रयत्न म्हणून रिसोड, मंगरूळपीर येथे १५ जुलैपासून लॉकडाऊन तर मालेगाव येथे जनता कर्फ्यू असल्याने बुधवारी या तिन्ही शहरात शुकशुकाट दिसून आला.
जुलै महिन्यात जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने, कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी मंगरूळपीर, रिसोड या शहरांमध्ये तसेच लगतच्या काही गावांमध्ये १५ जुलैपासून सात दिवस कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने १३ जुलै रोजी घेतला होता. या कालावधीत सर्व दुकाने, आस्थापना, खासगी कार्यालये, पेट्रोलपंप, बँक बंद राहणार आहेत. सकाळी ७ ते १० वाजता या दरम्यान केवळ दुध व भाजीपाला विक्री सुरु ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. पहिल्याच दिवशी रिसोड व मंगरूळपीर येथे लॉकडाऊनची प्रभावी अंमलबजावणी दिसून येत आहे. रस्त्यांवर शुकशुकाट असून, दवाखाने, मेडीकल, अत्यावश्यक सेवा वगळता उर्वरीत सर्व प्रतिष्ठाने बंद आहेत. मालेगाव शहरातही तिसऱ्या दिवशी जनता कर्फ्यूला शहरवासियांचा १०० टक्के प्रतिसाद लाभला.
बाहेरगावावरून परतणाºया नागरिकांमुळे जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. मे महिन्यापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या नियंत्रित होती. जून महिन्यापासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. जुलै महिन्यात यामध्ये झपाट्याने वाढ होत आहे. बाहेरगावावरून परतणाºया नागरिकांची आरोग्य तपासणीही केली जात असून, तालुकास्तरावरील कोविड केअर सेंटरमध्येच संदिग्ध रुग्णांचे स्वॅब नमुने घेतले जात आहेत. रिसोड व मंगरूळपीर शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने गर्दीवर नियंत्रण म्हणून तसेच कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्याचा प्रयत्न म्हणून जिल्हा प्रशासनाने सात दिवस कडक लॉकडाऊनचा निर्णय घेतलेला आहे. त्यानुसार १५ जुलैपासून या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी सुरू झाल्याचे दिसून आले. प्रमुख चौकांत चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
मालेगाव शहरातही कोरोनाची साखळी तोडण्यासाठी व्यापारी, मोबाईल असोसिएशन, नगर पंचायतचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य आदींनी पुढाकार घेत जनता कर्फ्यूची हाक दिली. त्यानुसार बुधवारी रस्त्यांवर शुकशुकाट दिसून आला.

 

Web Title: ‘Lockdown’; Spontaneous response in Risod, Malegaon, Mangrulpeer city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.