कुलूपबंद कोविड केअर सेंटर पुन्हा झाले सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:42 AM2021-02-24T04:42:04+5:302021-02-24T04:42:04+5:30

वाशिम जिल्ह्यात मार्च ते ऑक्टोबरदरम्यान कोरोना विषाणू संसर्गाचा उद्रेक झाला होता. त्यामुळे आरोग्य विभागाने रुग्णांवर उपचार करण्यासाठी शासकीय आणि ...

Locked Covid Care Center reopened | कुलूपबंद कोविड केअर सेंटर पुन्हा झाले सुरू

कुलूपबंद कोविड केअर सेंटर पुन्हा झाले सुरू

googlenewsNext

वाशिम जिल्ह्यात मार्च ते ऑक्टोबरदरम्यान कोरोना विषाणू संसर्गाचा उद्रेक झाला होता. त्यामुळे आरोग्य विभागाने रुग्णांवर उपचार करण्यासाठी शासकीय आणि खासगी मिळून १६ कोविड केअर सेंटर उभारली होती. ऑक्टोबरच्या अखेरपासून कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आल्याने जिल्हाभरातील खासगी आणि शासकीय मिळून १२ कोविड सेंटर बंद करण्यात आली; परंतु आता कोरोना संसर्ग पुन्हा उफाळून आल्याने आरोग्य विभागाकडून कुलूपबंद असलेली कोविड केअर सेंटर पुन्हा उघडली जात आहेत. त्यात सोमवारी कारंजा येथील १, मंगरुळपीर येथील १, रिसोड तालुक्यातील सवड येथील १ आणि वाशिम येथील १ सेंटर उघडण्यात आले.

--------

१) कोरोनाचे एकूण रुग्ण - ७,७७३

बरे झालेले रुग्ण - ७,११४

कोरोनाचे बळी - १५६

सध्या उपचार सुरू असलेले रुग्ण - ५०२

शहरातील कोविड केअर सेंटर

तालुका कोविड केअर सेंटर रुग्ण

वाशिम डीसीएच ०७

वाशिम डीसीएचसी ३६

वाशिम रेनॉल्ड हॉस्पिटल ०१

वाशिम मुलींचे वसतिगृह ००

---------

तालुका कोविड केअर सेंटर

तालुका कोविड केअर सेंटर रुग्ण

कारंजा डीसीएससी ४९

मं.पीर वसतिगृह तूळजापूर ००

रिसोड वसतिगृह सवड ००

-----------------

३) कारंजा तालुका धोक्याच्या वळणावर

जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यात अकोला, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या कारंजा तालुक्यात बाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण अधिक आहे. उपरोक्त तीन जिल्ह्यांतील हजारो नागरिक कारंजामार्गेच वाशिम जिल्ह्यात दाखल होत असल्याने आणि कारंजा तालुक्यातील शेकडो नागरिक दरदिवशी या जिल्ह्यातून ये-जा करीत असल्याने वाशिम जिल्ह्यात कारंजा तालुका धोक्याच्या वळणावर असल्याचे दिसत आहे.

---------------

कोट : सद्य:स्थितीत कारंजा येथे १ आणि वाशिम येथे ३ मिळून ४ कोविड केअर सेंटर सुरू असून, या सर्व ठिकाणी मिळून ९३ रुग्ण उपचार घेत आहेत. आता जिल्ह्यात वाढत असलेला कोरोना संसर्ग लक्षात घेता सोमवारी आणखी ४ कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आली असून, पुढे गरजेनुसार कोविड केअर सेंटरची संख्या वाढविण्यात येणार आहे.

- डॉ. अविनाश आहेर,

जिल्हा आरोग्य अधिकारी, वाशिम

Web Title: Locked Covid Care Center reopened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.