रोहयो कक्षाला ठोकले कुलूप!
By Admin | Published: June 17, 2017 07:33 PM2017-06-17T19:33:34+5:302017-06-17T19:33:34+5:30
कर्मचा-यांअभावी सिंचन विहीरीचे कामे रखडले; रिसोडमधील प्रकार, सिंचन विहीर लाभार्थ्यांमध्ये संतापाची लाट.
लोकमत न्यूज नेटवर्क
रिसोड : पंचायत समितीमधील महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या क क्षात कर्मचार्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे या पंचायत समिती अंतर्गत मंजूर ४00 सिंचन विहिरींचे काम रखडले आहे. या प्र्रकारामुळे संतापलेल्या लाभार्थींसह पंचायत समिती उपसभापती महादेवराव ठाकरेसह तालुक्यातील सरपंचांनी पंचायत समितीमधी रोहयो कक्षाला शुक्रवारी कुलूप ठोकले.
स्थानिक पंचायत समिती अंतर्गत जवळपास ४00 सिंचन विहीरी मंजूर आहेत; परंतु जिल्हाधिकारी कार्यालयाद्वारे पंचायत समिती मग्रारोहयो कक्षातील एपिओ, पिटीओ, संगणक परिचालकांच्या रिसोड इतर तालुक्यात बदल्या केल्या असून, त्यांच्या जागेवर कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली नाही. त्यामुळे या आठवडयात मग्रारोहयो अंतगत सुरु असलेल्या सिंचन विहीरीची कामे ठप्प झालेली आहेत. पावसाळा सुरु झाल्यामुळे काही दिवसातच सिंचन विहिरींचे मस्टर बंद होतील. या भितीने सिंचन विहीर लाभार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. याबाबीकडे मग्रारोहयो जिल्हाधिकारी कार्यालय व गटविकास अधिकारी, मग्रारोहयो कक्ष जि.प.वाशिम यांचे मुळीच लक्ष नाही. रोहयोच्या कामांत अडथळा निर्माण करण्याचे काम वरिष्ठ कार्यालय करिता असल्यामुळे तालुक्यात पालकमंत्री सहस्त्र सिंचन विहीर योजनेच्या लक्षांकाप्रमाणे १000 विहीरीही प्रत्येक तालुक्यात सुर होऊ शकल्या नाहीत अनेक सिंचन विहीर लाभाथीर्ंच्या अजार्ची चौकशी तलाठी, ग्रामसेवक यांच्या मार्फत करुन अनेक पात्र लाभार्थी अपात्र केले तर अपात्र लाभार्थी पात्र केल्यामुळे अनेक लाभार्थ्यांवर प्रशासनामुळे अन्याय झाला आहे. या आठवडयात पं.स.कार्यालयात रोहयो कक्षात कुणीही हजर नसल्यामुळे राजेगार सेवकांना खाली हाताने गावाकडे परत जावे लागत आहे. रोहयो कक्षात संगणक संच, प्रिंटर व महत्वाचीे कामदपत्रे उघडयावर असल्यामुळे ती गहाळ होऊ नये याबाबीची दक्षता घेऊन पंचायत समिती उपसभापती महादेवराव ठाकरे यांनी रोहयोच्या कक्षाला कुलूप लावण्याची सूचना गटविकास अधिकारी एम.सी.श्रृंगारे यांना दिली आणि तात्काळ मग्रोहरोयोच्या कक्षाला १७ जून रोजी दुपारी १ वाजता कुलुप ठोकण्यात आले. यावेळी उपसभापती महादेवराव ठाकरे, गटविकास अधिकारी एम.सी.श्रृंगारे यांच्यासह तालुक्यातील सरपंच, सिंचन विहीर लाभार्थी, रोजगार सेवक आदी उपस्थित होते.