कार्यालयीन वेळेत जबाबदार अधिका-यांच्या कक्षाला ‘कुलूप’!
By admin | Published: October 9, 2016 01:37 AM2016-10-09T01:37:05+5:302016-10-09T01:37:05+5:30
रिसोडच्या महिला, बालविकास कार्यालयातील प्रकार; ‘स्टिंग ऑपरेशन’मध्ये उघड झाला प्रकार.
विवेकानंद ठाकरे/शीतल धांडे
रिसोड(जि. वाशिम),दि. 0८- येथील पंचायत समिती कार्यालय परिसरात असलेल्या महिला व बालविकास कार्यालयात कार्यरत अधिका-यांनी चक्क कार्यालयीन वेळेतच कार्यालयाला कुलूप लावून दांडी मारल्याचा धक्कादायक प्रकार ह्यलोकमत स्टिंग ऑपरेशनह्णमध्ये उघडकीस आला.
पंचायत समितीत कार्यालयीन कामानिमित्त येणार्या नागरिकांच्या तक्रारींवरून ह्यलोकमतह्णने शहानिशा करण्यासाठी गुरूवारी महिला व बालविकास कार्यालयाचे ह्यस्टिंगह्ण केले. यादरम्यान महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी मदन नायक व विस्तार अधिकारी (सांख्यिकी) ए.डी.ठाकूर हे दोघेही कार्यालयीन वेळेत स्वत:चे ऑफीस बंद करुन बाहेरगावी गेल्याचे कार्यालयात उपस्थित असलेल्या अंगणवाडी पर्यवेक्षकांनी सांगितले.
कार्यालयाच्या दुस-या विभागात तीन अंगणवाडी सेविका व दोन कंत्राटी कर्मचारी आढळून आले. त्यांना संबंधित गैहजर अधिकार्यांबाबत विचारणा केली असता, कार्यालयातील कर्मचारी हजेरीपट व हलचल रजिस्टर उपलब्ध नसल्याचे त्यांनी सांगितले. गुरुवार हा दिवस रिसोड तालुक्यातील आठवडी बाजाराचा दिवस असतो. याच दिवशी तालुक्यातील प्रत्येक गावातून गोरगरीब लोक बाजार व कार्यालयीन कामकाज, या दुहेरी उद्देशाने शहरात येतात. महत्वपूर्ण असलेल्या या दिवशी कार्यालयात आलेल्या नागरिकांना महिला व बालविकास कार्यालय बंद असल्याने निराश होत परतावे लागले. यामुळे नागरिकांना नाहक आर्थिक भुर्दंंंड पडण्यासोबतच मानसिक त्रास देखील सहन करावा लागला. काही महिला तर साहेब येतील, या आशेने सायंकाळपर्यंंत ऑफीससमोर बसलेल्या आढळून आल्या. कार्यालयात कार्यालयीन एकही कर्मचारी तसेच शिपाई सुध्दा हजर नसल्याचे यावेळी आढळून आले. गैरहजर कर्मचारी व अधिका-यांचे रजेचे अर्ज देखील कार्यालयात नव्हते. याच परिसरात पंचायत समितीमधील काही कर्मचारी व अधिका-यांनी कार्यालयीन वेळेत दांडी मारल्याचे आढळून आले. यातील काही कर्मचार्यांची हजेरी पटावर स्वाक्षरी आहे. परंतु महिला व बालविकास कार्यालयातील कर्मचार्यांबाबत असे काहीच आढळले नाही.
नागरिकांच्या तक्रारींवरून करण्यात आले 'स्टिंग ऑपरेशन'
पंचायत समिती परिसरात असलेल्या महिला व बालविकास प्रकल्प कार्यालयातील जबाबदार अधिकारी व कर्मचारी आठवड्यातील तीन ते चार दिवस कार्यालयात कधीच हजर नसतात, अशा नागरिकांच्या तक्रारी होत्या. त्यावरून ह्यलोकमतह्णने शहानिशा करण्यासाठी गुरूवारी ह्यस्टिंग ऑपरेशनह्ण करून प्रत्यक्ष पाहणी केली असता, महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी मदन नायक व विस्तार अधिकारी ए.डी.ठाकूर यांच्यासह इतर कर्मचारीही गैरहजर आढळले. विशेष गंभीर बाब म्हणजे हे कार्यालय चक्क कुलूपबंद असल्याचे यावेळी निदर्शनास आले.