Lok Sabha Election 2019 : यवतमाळ-वाशिम मतदारसंघासाठी ३७ उमेदवारांचे नामांकन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 02:41 PM2019-03-26T14:41:50+5:302019-03-26T14:41:57+5:30

वाशिम : यवतमाळ-वाशिम या लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरण्याला १८ मार्चपासून सुरूवात झाली असून, नामांकन भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ३७ उमेदवारांनी नामांकन सादर केले.

Lok Sabha Election 2019: 37 candidates nominated for Yavatmal-Washim constituency | Lok Sabha Election 2019 : यवतमाळ-वाशिम मतदारसंघासाठी ३७ उमेदवारांचे नामांकन

Lok Sabha Election 2019 : यवतमाळ-वाशिम मतदारसंघासाठी ३७ उमेदवारांचे नामांकन

googlenewsNext


लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : यवतमाळ-वाशिम या लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरण्याला १८ मार्चपासून सुरूवात झाली असून, नामांकन भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ३७ उमेदवारांनी नामांकन सादर केले. शेवटच्या दिवशी २५ मार्च रोजी २६ उमेदवारांनी नामांकन सादर केले.
लोकसभा निवडणुकीसाठी नामाकंनाचा पहिला दिवस अपक्षांनी गाजविला. पहिल्याच दिवशी दोघांनी उमेदवारी दाखल करून मुहूर्त साधला होता.
यवतमाळ- वाशिम लोकसभा निवडणूक पहिल्या टप्प्यात असल्याने अपक्षांनी आपली तयारी सुरू केल्याचे दिसून आले. वेळेवर धावपळ नको म्हणून आवश्यक कागदपत्रांची जुळवाजूळव इच्छकांकडून केली गेलीे. प्रमुख पक्षांच्या संभाव्य उमेदवारांच्या प्रतिनिधींनी पहिल्या दिवशी नामाकंन अर्ज घेतले, यासोबत अपक्ष व विविध आघाडीतील उमेदवारांच्या प्रतिनिधीकडून उमेदवारी अर्ज घेण्यात आले .
पहिल्या दिवशी एकूण २२ जणांनी उमेदवारी अर्ज घेतले परंतु त्यातील दोन उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. यामध्ये भारतीय बहुजन आघाडीच्यावतिने रमेश गोरसिंग पवार तसेच जनता दल (से)तर्फे सुनील नटराजन नायर यांनी अर्ज दाखल केला होता.
दुसऱ्या दिवशी एकही नामांकन दाखल झाले नाही. परंतु १२ इच्छूक उमेदवारांनी अर्जाची उचल करण्यात आली होती. तिसऱ्या दिवशी २० मार्च रोजी दोन उमेदवारांनी नामांकन दाखल केले यामध्ये अंकित मोहन चांडक आणि समीर अरुण देशपांडे या अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. चौथ्या दिवशी रंगपंचमीची सुटी असल्याने पाचव्या दिवशी ७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. यामध्ये संदीप अनंतराव देवकते, रशीद खान हमीद खान, संतोष बाबुसिंग जाधव, अनिल जयराम राठोड, शेख जावेद शेख मुश्ताफ, शहेजाद समिउल्ला खान या सर्वांनी अपक्ष तर राष्टÑीय बहुजन काँग्रेस पार्टीच्यावतिने पुरूषोत्तम डोमाजी भजगवरे यांचा समावेश आहे.
सहाव्या व सातव्या दिवशी सुटी आल्याने कोणीही उमेदवारी अर्ज दाखल करु शकले नाही. परंतु शेवटच्या दिवशी राजकीय पक्षांसह २६ उमेदवारांनी नामांकन सादर केलेत. निवडणुकीसाठी अर्ज सादर करणाऱ्यांपैकी माघार कोण घेईल ते २८ मार्च रोजी दिसून येईल व यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल.

१८.९० लाख मतदार बजावणार मतदानाचा हक्क

वाशिम जिल्ह्यात तीन विधानसभा मतदारसंघ असून, यापैकी वाशिम व कारंजा हे दोन विधानसभा मतदारसंघ यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात तर रिसोड विधानसभा मतदारसंघ हा अकोला लोकसभा मतदारसंघात मोडतो. या मतदारसंघात यवतमाळ जिल्ह्यातील १२ लाख ५५ हजार २८३ आणि वाशिम जिल्ह्यातील ६ लाख ३५ हजार ५४६ असे एकूण १८ लाख ९० हजार ८२९ मतदार हे मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

Web Title: Lok Sabha Election 2019: 37 candidates nominated for Yavatmal-Washim constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.