Lok Sabha Election 2019 : यवतमाळ-वाशिम मतदारसंघात शिवसेनेच्या मतांवर भाजपा बंडखोराचा डोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2019 01:54 PM2019-04-02T13:54:35+5:302019-04-02T13:54:42+5:30

वाशिम : लोकसभेच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघात विरोधी फॅक्टर, नाराज मतदार, दिसत नसलेला परफॉर्मन्स, मतविभाजन यामुळे शिवसेनेची मतांची मार्जीन मोठ्या प्रमाणात खाली येण्याची शक्यता आहे.

Lok Sabha Election 2019: BJP rebel eyes on Shiv Sena votes in Yavatmal-Washim constituency | Lok Sabha Election 2019 : यवतमाळ-वाशिम मतदारसंघात शिवसेनेच्या मतांवर भाजपा बंडखोराचा डोळा

Lok Sabha Election 2019 : यवतमाळ-वाशिम मतदारसंघात शिवसेनेच्या मतांवर भाजपा बंडखोराचा डोळा

Next

- नंदकिशोर नारे
 
वाशिम : लोकसभेच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघात विरोधी फॅक्टर, नाराज मतदार, दिसत नसलेला परफॉर्मन्स, मतविभाजन यामुळे शिवसेनेची मतांची मार्जीन मोठ्या प्रमाणात खाली येण्याची शक्यता आहे. त्याचा फटका एखादवेळी सेनेला पराभवाचा धक्काही देण्याची हूरहूर शिवसैनिकांमध्ये पहायला मिळते.
शिवसेनेच्या भावनाताई गवळी पाचव्यांदा लोकसभेसाठी आपले नशीब आजमावित आहेत. त्यांची फाईट काँग्रेसच्या दिग्गज माणिकराव ठाकरे यांच्यासोबत आहे. २००९ च्या तुलनेत २०१४ ला भावनातार्इंच्या विजयी मतांची मार्जीन ५७ हजारांवरून थेट ९३ हजारांवर पोहोचली होती. मात्र त्यासाठी मोदी फॅक्टर कारणीभूत ठरला. त्यावेळीही तार्इंच्या विरोधात नाराजी होतीच. मात्र मोदी लाटेत त्या तरल्या. आता मोदींची लाट ओसरली. खासदार म्हणून तार्इंना वाशिम जिल्ह्यात २० तर यवतमाळ जिल्ह्यात दहा वर्ष झाले आहेत. त्यांचा परफॉर्मन्स, जनसंपर्क दिसत नसल्याने मतदार नाराज आहेत. मात्र मतदारसंघातील भाजपाचे चार, सेनेचा एक शिवाय भाजपाचा एक एमएलसी तार्इंना कसे तारतात हे पाहणे महत्वाचे ठरते.
त्यांच्या परफॉर्मन्सवर तार्इंच्या विजयाचे गणित अवलंबून आहे. तार्इंना भाजपाच्या बंडखोरापासून अधिक धोका आहे. हा बंडखोर तार्इंना बराच मायनस करू शकतो.
तार्इंच्या विरोधातील वातावरण, बंजारा समाजाला मिळालेला पर्याय, कुणबी समाजालाही असलेली चॉईस, काँग्रेसची परंपरागत गठ्ठा मते हीच काय ती काँग्रेसची जमेची बाजू आहे. काँग्रेसची सर्व मंडळी एकदिलाने काम करीत असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात तशी स्थिती आहे का याबाबत साशंकता आहे.
कारण काँग्रेसमधील गटबाजी मतदारांनी अनेक वर्ष अनुभवली आहे. पक्ष संपायला आला पण गटबाजी संपायचे नाव घेत नाही, अशी काँग्रेसची स्थिती आहे. बसपा, वंचित आघाडी, तीन मुस्लीम उमेदवार काँग्रेसला मायनस करणारे आहे.
चित्र बदलेल का? कसे?
 २००९ मध्ये काँग्रेस व राष्टÑवादीला विधानसभेच्या प्रत्येकी दोन जागा मिळाल्या.
 २०१४ मध्ये मोदी लाटेत या लोकसभा मतदारसंघात सहा पैकी सर्वाधिक चार जागा भाजपाला मिळाल्या.
आता २०१९ च्या निवडणुकीत भाजपाला आपल्या तेवढ्या जागा कायम राखणे कठीण दिसते. या जागा काँग्रेस अथवा अन्य पक्षाकडून हिसकावून घेतल्या जाऊ शकतात.

Web Title: Lok Sabha Election 2019: BJP rebel eyes on Shiv Sena votes in Yavatmal-Washim constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.